शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेतून स्टार कुस्तीपटू बाद; दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अडकले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2024 07:51 IST

दीपक पूनिया, सुजित कलाकल बाद; पूरस्थितीमुळे दोघेही दुबईत अडकले

नवी दिल्ली : बिश्केकमध्ये आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत भारतीय कुस्तीला जोरदार झटका बसला आहे. कारण भारताचे दोन आघाडीचे कुस्तीपटू दीपक पूनिया आणि सुजित कलाकल वेळेवर पोहोचू न शकल्यामुळे स्पर्धेतून बाद झाले आहेत. दुबईत खराब वातावरणामुळे त्यांचे विमान विलंबाने बिश्केकमध्ये पोहोचले. मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीमुळे दोघेही दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अडकले आणि वजने घेण्याच्या वेळेपर्यंत स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचू शकले नाहीत. सूत्रांनी सांगितले की, भारतीय प्रशिक्षकांनी विनंती करूनही आयोजकांनी त्यांना परवानगी दिली नाही.

पूनिया (८६ किलो) टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याच्या जवळ पोहोचला होता. तो आणि सुजित (६५ किलो) पॅरिस ऑलिम्पिकच्या पात्रता स्पर्धेत सहभागी होण्यासाठी बिश्केकला पोहोचले. दरम्यान, दुबईवरून जाणारी विमाने विमानतळांवर पाणी साचल्यामुळे रद्द करण्यात आली किंवा विलंबाने पोहोचली.      

रशियाचे प्रशिक्षक कमाल मालिकोव आणि फिजियो शुभम गुप्ता यांच्यासह दोघेही जमिनीवर झोपले आणि दुबई विमानतळावर पूरस्थितीमुळे भोजन न मिळाल्याने उपाशीपोटीच राहिले. सुजितचे वडील दयानंद कलाकल म्हणाले की, दोघेही १६ एप्रिलला दुबई विमानतळावर अडकले होते. बिश्केकला जाणारे विमान उपलब्ध होत नव्हते. दोघांचीही मला काळजी वाटते. दोघेही रशियात सराव करत होते आणि त्यांनी दुबईमार्गे बिश्केकला जाण्याचा निर्णय घेतला होता. पॅरिस ऑलिम्पिकची अखेरची जागतिक पात्रता स्पर्धा मे महिन्यात तुर्कीत होणार आहे.

टॅग्स :Wrestlingकुस्तीDubaiदुबईRainपाऊस