शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

स्टार सेरेना विलियम्सकडे दिग्गज खेळाडू कोर्टच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2019 07:29 IST

ऑस्ट्रेलियन ओपन : विक्रमी २४ ग्रँडमास्टर पटकावण्याचा ‘सुपरमॉम’चा निर्धार

मेलबर्न : पुढील आठवड्यात सुरू होत असलेल्या आॅस्ट्रेलियन ओपन टेनिसमध्ये मार्गारेट कोर्टच्या २४ एकेरी ग्रँडस्लॅम विक्रमाची बरोबरी साधण्याची संधी सेरेना विलियम्सकडे असेल. आॅस्ट्रेलियाची खेळाडू राहिलेल्या कोर्टने २४ ग्रँडस्लॅमपैकी १३ जेतेपद १९६८ आधीच जिंकले होते. महिला टेनिस ओपन युगाची सुरुवात त्यानंतर झाली. सध्या ७६ वर्षांची असलेल्या कोर्टने १९६० ते १०७३ पर्यंत एकेरीचे २४ विजेतेपद पटकविले. त्यात ११ ऑस्ट्रेलियन ओपन, तीनवेळा फ्रेंच ओपन, सात विम्बल्डन आणि पाच अमेरिकन ओपन जेतेपदाचा समावेश आहे.

सेरेनाने १९९८ पासून आतापर्यंत २३ एकेरी ग्रँडस्लॅम जिंकले. त्यात सात आॅस्ट्रेलियन ओपन, तीन फ्रेंच ओपन, सात विम्बल्डन आणि सहा अमेरिकन ओपन जेतेपदाचा समावेश आहे. कारकिर्दीत १८ ग्रँडस्लॅम जिंंकणारी ख्रिस एव्हर्ट हिच्यामते सध्याच्या खेळाचा दर्जा आधीच्या तुलनेत फारच उत्कृष्ट असल्याने तुलनाच होऊ शकत नाही. एव्हर्ट म्हणाली, ‘सेरेना सर्वोत्कृष्ट आहे यात शंका नाही. आम्ही आपल्यावेळी सर्वोत्कृष्ट होतो आणि सेरेना सध्याच्या युगात सर्वोत्कृष्ट आहे. २०१७ च्या आॅस्ट्रेलियन ओपनपासून सेरेनाची नजर २४ व्या जेतेपदावर आहे. त्यावेळी आठ आठवड्यांची गर्भवती असलेल्या सेरेनाने जेतेपद पटकविले होते. विक्रमाविषयी फारशी चिंतेत नाहीसेरेना माझा विक्रम मोडेल किंवा बरोबरी साधेल याबाबत मी फारशी चिंतेत नाहीं, असे सांगून कोर्ट म्हणाली, ‘मी २४ एकेरी ग्रँडस्लॅमशिवाय ४० दुहेरीचे ग्रॅन्डस्लॅम जिंकले याचे मोठे समाधान आहे. माझ्यामते कुठलाही खेळाडू माझ्या ५४ ग्रँडस्लॅम जेतेपदाची बरोबरी करू शकणार नाही. तथापि कुणी २४ पेक्षा अधिक एकेरीचे जेतेपद पटकवित असेल तर ती व्यक्ती निचितपणे हकदार होऊ शकेल.’रामकुमार, अंकिता विजयीमेलबर्न : भारतीय टेनिसपटू रामकुमार रामनाथन आणि अंकिता रैना यांनी आॅस्ट्रेलियन ओपनच्या पात्रता फेरीत सरळ सेटमध्ये विजय नोंदविले पण करमन कौर थंडी पहिल्याच सामन्यात पराभूत होऊन बाहेर पडली. रामकुमारने पुरुष एकेरीत स्पेनचा सर्जियो गुइटिरेज याचा ६-३,६-२ ने पराभव केला. अंकिताने फ्रान्सची मार्टिले गार्जेस हिच्यावर ६-२,६-२ ने विजय साजरा केला. त्याचवेळी पहिल्यांदाच या स्पर्धेत सहभागी झालेली करमन थंडी जेनिफर ब्राडीकडून ०-६, ५-७ ने पराभूत झाली. प्रज्नेश गुणेश्वरन आज बुधवारी क्रोएशियाचा व्हिक्टर गालोविच याच्याविरुद्ध पहिला सामना खेळेल. 

टॅग्स :serena williamsसेरेना विल्यम्सAustralian Openऑस्ट्रेलियन ओपन