मुलहीम एन डर रुर (जर्मनी) : भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू के. श्रीकांतने जर्मन ओपन ग्रांप्री गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेत चांगली सुरुवात करताना स्लोव्हाकियाच्या अॅलेन रोज याला नमवत दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला.श्रीकांतने अॅलेनचा काल रात्री २१ मिनिटे रंगलेल्या एकतर्फी लढतीत २४-४, २१-११, असे पराभूत केले. त्याची पुढील लढत जपानच्या युसुके ओंडेराशी होईल. दरम्यान, शुभांकर डे याने चीनच्या झाओ जुनपेंग याचा १६-२१, २१-१७, २१-१९, असा पराभव केला आणि आता त्याला हाँगकाँगच्या एनजी लोंग याच्याशी दोन हात करावे लागतील. हर्षित अग्रवालने अमेरिकेच्या ब्योर्न सेगुनचा एका अन्य सामन्यात १८-२१, २१-८, २१-१६, असा पराभव केला. हर्षित पुढील फेरीत हाँगकाँगच्या हु युन याच्याविरुद्ध खेळेल. अन्य भारतीय खेळाडूंत सिरील वर्मा आणि हर्षल दाणी तसेच महिला गटात तन्वी लाड यांना पराभव पत्करावा लागला.
श्रीकांत दुसऱ्या फेरीत
By admin | Updated: March 2, 2017 00:21 IST