स्पोर्टपेज: राज्य स्तर स्पर्धेसाठी अकोला जिल्हा लगोरी संघ घोषित
By admin | Updated: September 29, 2014 21:46 IST
अकोला : पुणे येथे ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार्या महाराष्ट्र राज्यस्तरीय मिनी लगोरी अजिंक्यपद स्पर्धेसाठी अकोला जिल्हा संघ सोमवार, २९ सप्टेंबर रोजी घोषित करण्यात आला. निवड झालेल्या संघाचे स्पर्धापूर्व सराव शिबिराला वसंत देसाई क्रीडांगण येथे सोमवारीच प्रारंभ करण्यात आला.
स्पोर्टपेज: राज्य स्तर स्पर्धेसाठी अकोला जिल्हा लगोरी संघ घोषित
अकोला : पुणे येथे ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार्या महाराष्ट्र राज्यस्तरीय मिनी लगोरी अजिंक्यपद स्पर्धेसाठी अकोला जिल्हा संघ सोमवार, २९ सप्टेंबर रोजी घोषित करण्यात आला. निवड झालेल्या संघाचे स्पर्धापूर्व सराव शिबिराला वसंत देसाई क्रीडांगण येथे सोमवारीच प्रारंभ करण्यात आला.संघाची निवड राष्ट्रीय पंच अमित मनवर व क्रीडा शिक्षक सुनील दांदळे यांनी केली. जिल्हा लगोरी संघटनेचे सचिव जयदीप सोनखासकर यांनी संघाची निवड जाहीर केली. मुलांच्या संघात विजय सोळंके कर्णधार, यश वढाळे, साहिल सावळे, महेश ताले, सुमित तायडे, आर्यन वाहुरवाघ, रिक्की शाहू, सोहम वानखडे, प्रशील सिरसाट, अमित भटकर, साहिल पागृत, प्रज्योत सोनोने, प्रशिक्षक अमित मनवर, संघव्यवस्थापक पी.बी.दुपारे. मुलींमध्ये खुशी बनसोड कर्णधार, निशा तायडे, देवयानी सांगूनवेढे, शर्वरी इंगळे, आकांक्षा गवई, यशदा सोनखासकर, ईश्वरी मडावी, सुहानी गवई, संघव्यवस्थापिका ज्योती डाबेराव यांचा समावेश आहे. संघ ३ ऑक्टोबर रोजी पुणे येथे स्पर्धेकरिता रवाना होणार असल्याची माहिती संघटनेचे सचिव सोनखासकर यांनी दिली. (क्रीडा प्रतिनिधी)फोटो: मार्गदर्शक जयदीप सोनखासकर यांच्यासोबत निवड झालेला जिल्हा लागोरी संघातील खेळाडू.३०सीटीसीएल२६...