स्पोर्टपेज: कुशल काकडच्या शानदार ७३ धावा खैरागड चषक क्रिकेट स्पर्धा-२०१४
By admin | Updated: September 29, 2014 21:46 IST
अकोला : अकोला क्रिकेट क्लब मैदानावर सुरू असलेल्या खैरागड चषक क्रिकेट स्पर्धेतील आज, सोमवारी बुलडाणा व अकोला जिल्हा संघातील दोन दिवसीय सामन्याला सुरुवात झाली. अकोल्याच्या कुशल काकड याने धुवाधार ७३ धावा काढून मैदान दणादूण सोडले.
स्पोर्टपेज: कुशल काकडच्या शानदार ७३ धावा खैरागड चषक क्रिकेट स्पर्धा-२०१४
अकोला : अकोला क्रिकेट क्लब मैदानावर सुरू असलेल्या खैरागड चषक क्रिकेट स्पर्धेतील आज, सोमवारी बुलडाणा व अकोला जिल्हा संघातील दोन दिवसीय सामन्याला सुरुवात झाली. अकोल्याच्या कुशल काकड याने धुवाधार ७३ धावा काढून मैदान दणादूण सोडले.बुलडाणा संघाने पहिल्या डावाची सुरुवात करीत ५२.२ षटकात सर्वबाद २१७ धावा काढल्या. ऋषिकेश पवारच्या ३० धावा, विवेक मोरे याने झळकविलेले शानदार अर्धशतक आणि शेख जुबेरच्या ३१ धावा. या व्यतिरिक्त अन्य फलंदाजांनी खेळपीवर फारशी चांगली कामगिरी केली नाही. अकोल्याच्या पी.आठवले याने टिपलेले बुलडाण्याचे ३ गडी महत्त्वपूर्ण ठरले. कुशल काकड आणि मयूर बडे यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. इम्रान कमाल याने १ गडी बाद केला. अकोला संघाने आपल्या डावाची सुरुवात केली असून, दिवसअखेर २७.५ षटकात ३ बाद १३९ धावा काढल्या. कुशल काकडचा आजचा खेळ प्रेक्षणीय ठरला. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये आपली वैशिष्ट्येपूर्ण शैलीचा वापर करून कुशलने उत्कृष्ट क्रिकेटचे प्रदर्शन केले. प्रणव आठवले याने ४१ धावा काढून मैदान सोडले. अक्षय राऊत आणि चैतन्य हिरपूरकरची फलंदाजी सुरू असून, अक्षयच्या नाबाद १६ धावा आहेत. चैतन्यने अद्याप धावांचे खाते उघडले नाही. अकोला संघ पहिल्या दिवशी ७८ धावांनी बुलडाणा संघाच्या मागे आहे. सामन्यात पंच म्हणून अनिल एदलाबादकर व संजय बुंदेले काम पाहत आहे. गुणलेखन अभिजित मोरेकर करीत आहेत. उद्या मंगळवार, ३० सप्टेंबर सामन्याचा दुसरा दिवस राहील. स्पर्धेचे आयोजन विदर्भ क्रिकेट संघटनेच्यावतीने केले आहे. (क्रीडा प्रतिनिधी)...