शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
3
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
4
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
5
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
8
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
9
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
10
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
11
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
12
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
13
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
14
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
15
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
16
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
17
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
18
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
19
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
20
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय

फिरकीचा फास, विजयाची आस

By admin | Updated: November 27, 2015 00:47 IST

फिरकीच्या आखाड्यात भारतातर्फे रविचंद्रन अश्विन व रवींद्र जडेजा या फिरकीपटूंनी कसलेल्या मल्लांची भूमिका बजावत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी गुडघे टेकवण्यास भाग पाडले.

भास्कर चौधरी, नागपूरफिरकीच्या आखाड्यात भारतातर्फे रविचंद्रन अश्विन व रवींद्र जडेजा या फिरकीपटूंनी कसलेल्या मल्लांची भूमिका बजावत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी गुडघे टेकवण्यास भाग पाडले. अश्विन (५-३३) व जडेजा (४-३३) यांच्या अचूक माऱ्यापुढे दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव ७९ धावांत संपुष्टात आला. पहिल्या डावात १३६ धावांची दमदार आघाडी घेणाऱ्या भारताने दुसऱ्या डावात १७३ धावांची मजल मारली आणि दक्षिण आफ्रिकेपुढे विजयासाठी ३१० धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करताना दुसऱ्या दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या डावात २ बाद ३२ अशी अवस्था झाली आहे. आजचा खेळ थांबला त्यावेळी डीम एल्गर (१०) आणि कर्णधार हाशिम अमला (३) खेळपट्टीवर होते. दक्षिण आफ्रिका संघाची या सामन्यातील कामगिरी बघता आज, शुक्रवारी तिसऱ्या दिवशी भारतीय संघ फिरकीचा फास कसा आवळतो आणि मालिका विजय किती वेळात साकारतो, याची उत्सुकता कायम राखत गुरुवारी दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला. जामठ्याच्या खेळपट्टीवर दुसऱ्या दिवशी २० फलंदाज बाद झाले. द. आफ्रिकेला विजयासाठी अद्याप २७८ धावांची गरज असून त्यांच्या आठ विकेट शिल्लक आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. आठव्या षटकात अश्विनने स्टियान वान जिलला (५) माघारी परतवले, तर नाईट वॉचमन इम्रान ताहिर (८) याचा मिश्राने त्रिफळा उडविला.त्यापूर्वी, पहिल्या डावात १३६ धावांची आघाडी घेणाऱ्या भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. फॉर्मात असलेला मुरली विजय (५) उपाहारानंतर मोर्केलचे लक्ष्य ठरला. त्यानंतर धवन व पुजारा यांनी दुसऱ्या विकेटसाठी ४४ धावांची भागीदारी करीत डाव सावरला. पुजाराला (३१) ड्युमिनीने बाद करीत ही भागीदारी संपुष्टात आणली. २ बाद ५२ अशी स्थिती असताना धवनने (३९) खेळपट्टीवर आलेला कर्णधार विराट कोहलीच्या साथीने तिसऱ्या विकेटसाठी ४५ धावांची भागीदारी करीत मोठी धावसंख्या उभारण्याचे संकेत दिले, पण रिव्हर्स स्विपचा फटका खेळण्याच्या प्रयत्नात धवनने विकेट बहाल केली व ही भागीदारी संपुष्टात आली. भारताची एकवेळ २ बाद ९७ अशी मजबूत स्थिती होती. धवन बाद झाल्यानंतर मात्र भारताची घसरगुंडी उडाली. कोहली (१६), रहाणे (९), साहा (७) आणि जडेजा (५) यांना मोठी खेळी करता आली नाही. रोहित शर्माने २३, तर अमित मिश्राने १४ धावांचे योगदान दिल्यामुळे भारताला दुसऱ्या डावात १७३ धावांची मजल मारता आली. दक्षिण आफ्रिकेतर्फे दुसऱ्या डावात सर्वाधिक यशस्वी गोलंदाज इम्रान ताहिरने ३८ धावांच्या मोबदल्यात पाच बळी घेतले. मोर्केलने तीन, तर हार्मर व ड्युमिनी यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. त्याआधी, कालच्या २ बाद ११ धावसंख्येवरून गुरुवारी पुढे खेळताना सकाळच्या सत्रात अश्विन व जडेजाच्या अचूक माऱ्यापुढे दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव ७९ धावांत संपुष्टात आला. एकवेळ त्यांची ५ बाद १२ अशी अवस्था झाली होती. भारताविरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा हा धावसंख्येचा नीचांक ठरला. यापूर्वी जोहान्सबर्गमध्ये १९९६ मध्ये दक्षिण आफ्रिका संघ ८४ धावांत गारद झाला होता. भारतात यापूर्वी दक्षिण आफ्रिका संघाचा कसोटी सामन्यात धावसंख्येचा नीचांक १०५ होता. १९९६ मध्ये अहमदाबाद येथे मोटेरा स्टेडियममध्ये दक्षिण आफिका संघ १०५ धावांत बाद झाला होता. गुरुवारी जे.पी. ड्युमिनीचा (३५) अपवाद वगळता दक्षिण आफ्रिकेच्या अन्य फलंदाजांनी भारतीय फिरकीपुढे सपशेल शरणागती पत्करली. अश्विनच्या गोलंदाजीवर कर्णधार विराट कोहलीने ड्युमिनीचा झेल टिपला असता तर त्यांची आणखी बिकट अवस्था झाली असती. त्यावेळी ड्युमिनी वैयक्तिक १३ धावांवर खेळत होता. दक्षिण अफ्रिकेने सकाळच्या सत्रात पाच षटकांत तीन बळी गमावले. रविचंद्रन अश्विनने डावात १४ व्यांदा पाच बळी घेण्याची कामगिरी करताना दक्षिण आफ्रिकेचा डाव गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याला रवींद्र जडेजाने (४-३३) योग्य साथ दिली. अमित मिश्राने जे. पी. ड्युमिनीचा महत्त्वाचा बळी घेतला. दक्षिण आफ्रिकेचा १२ धावांत निम्मा संघ गारद होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी १९०२ मध्ये आॅस्ट्रेलियाविरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ १४ धावांत तंबूत परतला होता. भारताच्या यशाचे श्रेय फिरकीपटूंना : डोमिंगोमाझा संघ व्हीसीएच्या खेळपट्टीवर टीका करणार नाही. पहिल्या दोन दिवसांत ३२ गडी बाद झाल्यानंतर आमचा संघ बॅकफुटवर आला. या यशाचे श्रेय भारतीय फिरकी गोलंदाजांनाा जात असल्याचे मत द. आफ्रिकेचे कोच रसेल डोमिंगो यांनी व्यक्त केले.दुसऱ्या दिवसाचा खेळ संपताच पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘भारताला यशाचे श्रेय द्यावे लागेल. भारताने आपल्या शैलीनुसार विकेट तयार केली आणि फिरकी गोलंदाजांनी यशस्वी कमाल केली. भारतीयांची फिरकी उत्कृष्ट होती. आम्ही मात्र खेळपट्टीला दोष देणार नाही.’ द. आफ्रिकेने पहिल्या डावांत ७९ असा नीचांक नोंदविला. यावर डोमिंगो म्हणाले, ‘मालिका जिंकत असतो तेव्हा खेळपट्टीवर टीका करणे सोपे होते; पण मालिकेत माघारताच टीका करणे कठीण होऊन बसते.’ धा व फ ल कभारत पहिला डाव २१५दक्षिण आफ्रिका प. डाव : डीन एल्गर त्रि. गो. अश्विन ०७, स्टियान वान जिल झे. राहणे गो. अश्विन ००, इम्रान ताहिर त्रि. गो. जडेजा ०४, हशिम अमला झे. रहाणे गो. अश्विन ०१, ए.बी. डिव्हिलियर्स झे. व गो. जडेजा ००, फॅफ ड्यू प्लेसिस त्रि. गो. जडेजा १०, जे.पी. ड्युमिनी पायचित गो. मिश्रा ३५, डेल विलास त्रि. गो. जडेजा ०१, सिमोन हार्मर त्रि. गो. अश्विन १३, कागिसो रबाडा नाबाद ०६, मोर्नी मोर्केल झे. व गो. अश्विन ०१. अवांतर (१). एकूण ३३.१ षटकांत सर्वबाद ७९. बाद क्रम : १-४, २-९, ३-११, ४-१२, ५-१२, ६-३५, ७-४७, ८-६६, ९-७६, १०-७९. गोलंदाजी : ईशांत २-१-४-०, अश्विन १६.१-६-३२-५, जडेजा १२-३-३३-४, मिश्रा ३-०-९-१.भारत दुसरा डाव : मुरली विजय झे. अमला गो. मोर्केल ०५, शिखर धवन झे. विलास गो. ताहिर ३९, चेतेश्वर पुजारा त्रि.गो. ड्युमिनी ३१, विराट कोहली झे. प्लेसिस गो. ताहिर १६, अजिंक्य रहाणे झे. ड्युमिनी गो. ताहिर ०९, रोहित शर्मा झे. एल्गर गो. मोर्केल २३, वृद्धिमान साहा झे. अमला गो. ताहिर ०७, रवींद्र जडेजा त्रि. गो. हार्मर ०५, रविचंद्रन अश्विन पायचित मोर्केल ०७, अमित मिश्रा त्रि. गो. ताहिर १४, ईशांत शर्मा ०१. अवांतर (१६). एकूण ४६.३ षटकांत सर्वबाद १७३. बाद क्रम : १-८, २-५२, ३-९७. ४-१०२, ५-१०८, ६-१२२, ७-१२८, ८-१५०, ९-१७१, १०-१७३. गोलंदाजी : मोर्केल १०-५-१९-३, हार्मर १८-३-६४-१, रबाडा ५-१-१५-०, ड्युमिनी २-०-२४-१, ताहिर ११.३-२-३८-५.दक्षिण आफ्रिका दुसरा डाव : डीन एल्गर खेळत आहे १०, स्टियान वान जिल झे. रोहित गो. अश्विन ०५, इम्रान ताहिर पायचित गो. मिश्रा ०८, हाशिम अमला खेळत आहे ०३. अवांतर (६). एकूण १४ षटकांत २ बाद ३२. बाद क्रम : १-१७, २-२९. गोलंदाजी : ईशांत ३-१-६-०, अश्विन ६-२-१२-१, जडेजा ४-२-६-०, मिश्रा १-०-३-१.>>> जोहान्सबर्गची तक्रार नाही तर नागपूरची का ?भारतीय उपखंडातील फिरकीला अनुकूल खेळपट्ट्यांवर टीका करणाऱ्यांना चोख उत्तर दिले. ट्रेन्टब्रिजमध्ये अ‍ॅशेस कसोटी जवळजवळ दोन दिवसांत संपल्यानंतर खेळपट्टीबाबत कुणी प्रश्न उपस्थित केला नाही. जोहान्सबर्गमध्ये डिसेंबर २०१३ ला पाचव्या दिवशीही खेळपट्टीकडून मला कुठली मदत मिळाली नव्हती, असे सांगताना अश्विनने दक्षिण आफ्रिकेतील खेळपट्ट्यांबाबतही प्रश्न उपस्थित केला. व्हीसीएच्या जामठा स्टेडियममध्ये खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशीच्या खेळानंतर अश्विन पत्रकार परिषदेत बोलत होता. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांचे स्वागत फिरकीला अनुकूल खेळपट्ट्यांद्वारे करण्यात येत आहे का, याबाबत बोलताना अश्विन म्हणाला, ‘जोहान्सबर्ग कसोटीनंतर मी कधी तक्रार केली नव्हती. त्यानंतर मला वर्षभर संघातील स्थान गमवावे लागले होते. मी येथे खेळण्याबाबतही तक्रार करीत नाही. ट्रेन्टब्रिजमध्ये स्विंग, सीम आणि वेगवान गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टीवर सामना दोन दिवसांत संपला. त्यावेळी कुणी तक्रार केली नाही. अश्विन पुढे म्हणाला, ‘फिरकी खेळण्याचे कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे. अश्विन पुढे म्हणाला, ‘खेळपट्टी कशी असावी, हे मैदानातील कर्मचाऱ्यांना सांगण्याचा मला अधिकार नाही. खेळपट्टी तयार झाली म्हणजे त्यावर खेळण्याचे माझे काम आहे. खेळपट्टीबाबत गरजेपेक्षा अधिक चर्चा होत आहे. हे माझे वैयक्तिक मत आहे. उभय संघात दर्जेदार खेळाडू असून तुम्ही त्यांच्यासोबत चर्चा करू शकता.’