शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

एसपीजी टेनिस: भावेश नवलु-मनोज मांगेला जोडी अजिंक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 16:52 IST

भावेश नवलु व मनोज मांगेला जोडीने आशिष प्रजापती व संदीप मोरे जोडीचा ६-३ असा चुरशीचा पराभव केला

मुंबई : भावेश नवलु व मनोज मांगेला जोडीने आशिष प्रजापती व संदीप मोरे जोडीचा ६-३ असा चुरशीचा पराभव केला आणि टेनिसपटू-संघटक स्व. पी.एस. उर्फ दादा खानोलकर स्मृती चषक एसपीजी दुहेरी टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले. भावेश व मनोज यांच्या अप्रतिम सर्व्हिससह भावेशने नेट जवळून मारलेले फटके प्रतिस्पर्ध्यांना पराभवाच्या खाईत लोटणारे ठरले. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ एसआय सायबर कंपनीचे कार्यकारी संचालक संकेत खानोलकर व शिवाजी पार्क जिमखान्याचे असिस्टंट सेक्रेटरी सुनील रामचंद्रन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या स्पर्धेचे आयोजन जिमखान्यातील टेनिस कोर्टवर करण्यात आले होते.

  एसपीजी दुहेरी टेनिसची भावेश-मनोज विरुद्ध आशिष-संदीप या जोडीमधील अंतिम फेरी उत्तरार्धात विशेष रंगली. नाणेफेक जिंकून मनोज मांगेलाने पहिलीच सर्व्हिस राखत १-० अशी आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये  प्रतिस्पर्धी प्रमुख खेळाडू आशिष प्रजापतीची सर्व्हिस मोडीत काढतांना भावेश नवलुने सुंदर परतीचे फटके मारत निर्णायक गुण वसूल केले. पुढच्याच सर्व्हिसचा तिसरा सेट भावेशने मनोजच्या साथीने जिंकत ३-० अशी एकतर्फी आघाडी घेतली. त्यानंतर मात्र आशिष प्रजापती व संदीप मोरे जोडीने चौथ्या, सहाव्या व आठव्या सेटमध्ये विजयी पुनरागमन करूनही ३-५ अशा पिछाडीवर राहिले. त्यांना प्रतिस्पर्ध्यांची विशेषतः मनोज मांगेलाची पाचव्या सेटमधील सर्व्हिस भेदण्यात अपयश आले. त्यामुळे जोशपूर्ण खेळ करीत भावेश-मनोज जोडीने ६-३ असा विजय मिळवीत अजिंक्यपदाच्या रोख रुपये बारा हजारसह दादा खानोलकर स्मृती चषकावर शिक्कामोर्तब केला.        शिवाजी पार्क जिमखानातर्फे एसआय सायबर सहप्रायोजित टेनिस मार्कर व सहाय्यक प्रशिक्षक यांच्यासाठी आयोजित दुहेरी टेनिस स्पर्धेत मुंबईसह ठाणे, पालघर, सोलापूर, पुणे, औरंगाबाद, नागपूर आदी जिल्ह्यातील दुहेरीचे ६५ स्पर्धक सहभागी झाले होते. उपांत्य उपविजेतेपद समीर शेख-परमेश्वर मणी व निर्मल स्वामी-अक्षय चोरगे या जोडीने तर उपांत्यपूर्व उपविजेतेपद नीलकंठ डमरे-वेंकू धनगर, दत्ता जगदाळे-इम्रान शेख, मंगेश इनामे-अक्षय इनामे आणि उत्कृष्ट जोडी पुरस्कारासह नागेश खारवी-विजय गिरी यांनी पटकाविला.

टॅग्स :Tennisटेनिस