शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
4
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
5
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
6
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
7
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
8
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
9
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
10
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
11
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
12
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
13
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
14
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
15
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
16
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
17
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
18
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
19
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
20
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर

स्पेशल ऑलिम्पिक्सच्या पदकांनी सुवेतलाही बनविले ‘सेलीब्रिटी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 18:57 IST

पॉवरलिफ्टींगात जागतिक पदक मिळविणारा पहिला गोमंतकीय : अचंबित करणारी वाटचाल

सुशांत कुंकळयेकर, मडगाव: शरीर किंवा परिस्थिती भलेही साथ न देवो पण जर तुम्ही मनात कुठलीही आकांक्षा बाळगली आणि तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करण्याची तयारी ठेवली तर गगनही ठेंगणो होते. पंटेमळ-कुडचडे येथील सुवेत सतीश लोटलीकर याच्या बाबतीतही ते खरे ठरले आहे. अबु धाबीत झालेल्या स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये दोन कांस्यपदक पटकावून गोव्यात आलेल्या सुवेतचे अगदी हिरोईक स्वागत झाले आहे. सोशल मिडियावर त्याला मिळत असलेले लाईक्स पाहिल्यास तो आता ‘सेलीब्रिटी’मध्ये गणला जाणार असेही जाणवू लागले आहे. या ऑलिम्पिक्समध्ये सुवेतने पॉवरलिफ्टींग आणि बँच प्रेस या दोन क्रीडा प्रकारात ही पदके मिळविली. पॉवरलिफ्टींग या क्रीडा प्रकारात जागतिक पदक मिळविणारा पहिलाच गोमंतकीय खेळाडू बनण्याचा मानही त्याने पटकाविला. लहान असताना सतत आजारी पडणा:या सुवेतने आजवर मारलेली मजल त्यामुळेच अचंबित करणारी ठरली आहे.अबु धाबीहून शनिवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास सुवेतचे विमान दाबोळीला पोहोचले तेव्हा त्याच्या स्वागताला त्याचे आई-वडील सतीश व सरिता यांच्यासह त्याचे प्रशिक्षक रवी देसाई एवढेच नव्हे तर कुडचडेतील सुमारे शंभर लोक हजर होते. गळ्यात दोन पदके घालून विमानतळाच्या बाहेर आलेल्या सुवेतचे एवढय़ा अगत्याने स्वागत केले गेले की आता माङया डोळ्यावरची झोपही उडाली असे शद्ब सुवेतच्या तोंडून आले. मात्र कुडचडे ते अबु धाबी हा त्याचा आजवरचा प्रवास एवढा सोपा होता का? त्याचे वडील सतीश सांगतात, कुठल्याही आई-वडिलाला आपले मुल सुदृढ असावे असे वाटणो साहजिकच. मात्र सुवेत जन्मताच काहीसा विकलांग असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याच्या आई-वडिलांनाही धक्का बसलाच. डॉक्टरनीही त्याची आशा सोडली होती. लहान असताना सुवेत एवढा आजारी असायचा की हवामानात थोडाही बदल झाला की तो एवढा आजारी पडायचा की त्याला थेट गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करावे लागायचे. लहानपणात एवढा आजारी पडणारा सुवेत बॉडीबिल्डींग आणि पॉवरलिफ्टींग यासारख्या  अंगमेहनतीच्या खेळात प्रविण कसा होऊ शकला?त्याच्या या प्रवासाबद्दल त्याचे वडील सांगतात, 1992 मध्ये कुडचडेत खास मुलांसाठी असलेल्या संजय विद्यालयाची स्थापना झाली. कुडचडेतील सर्वोदय हायस्कूलच्या एका खोलीत या खास मुलांचे वर्ग भरायचे. त्या शाळेत सुवेतलाही भरती करण्यात आले. या शाळेच्या शेजारी एक व्यायामशाळा होती. या व्यायामशाळेत जाणा:या युवकांना पाहून सुवेतलाही  आपण असेच काहीतरी व्हावे असे वाटायला लागले. मात्र तो लहान असल्याने त्याला या व्यायामशाळेत दाखल होता आले नाही. मात्र वयाच्या 16व्या वर्षी सुवेतला व्यायामशाळेत दाखल करुन घेण्यात आले. एसएजीचे प्रशिक्षक रवी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली त्याची तयारी सुरु झाली. आणि आश्र्चर्याची गोष्ट म्हणजे, या व्यायामशाळेने सुवेतच्या आरोग्याच्या बाबतीतही बदल घडवून आणण्यास सुरुवात केली. पूर्वी सतत आजारी पडणा:या सुवेतपासून आता आजारही दूर पळाले होते. त्याचे वडील सांगतात, या व्यायामशाळेत सुवेत एवढा रमला की घरापेक्षाही त्याला ही व्यायामशाळाच जास्त आवडू लागली.2017 मध्ये सुवेतची स्पेशल ऑलिम्पिक भारत या स्पर्धेसाठी निवड झाली आणि कोल्हापुरात झालेल्या या स्पर्धेत पहिल्याच प्रयत्नात सुवेतने दोन सुवर्णपदके पटकावली आणि त्याचे नाव सर्वत्र झाले. कुडचडेच्या चेतना स्कूलमध्ये शिकणारा सुवेत त्यानंतर जणू सेलेब्रिटीच झाला. सुवेतने इथर्पयत मजल मारण्यासाठी गोवा क्रीडा प्राधिकरणाचाही मोठा वाटा असल्याचे लोटलीकर सांगतात. मागची 15 वर्षे कुठलीही फी न आकारता सागच्या व्यायामशाळेत त्याला प्रशिक्षण देण्यात आले. त्याचे प्रशिक्षक रवी देसाई यांनी तर आपल्या स्वत:च्या मुलाला सांभाळावे त्याप्रमाणो सुवेतची देखभाल केली.सतत आजारी पडणारा सुवेत आणि आज पॉवरलिफ्ंिटगसारख्या स्पर्धेत जागतिक स्तरावर पदक पटकावणारा सुवेत इथर्पयतच्या प्रवासाबद्दल बोलताना लोटलीकर म्हणतात, आज मला वाटते की सुवेतमुळे आमचे आयुष्य धन्य झाले. कुठल्याही मुलात जर काही व्यंग असले तरी त्याच्याकडे काही खास गुणही असतात. वेळीच हे गुण पारखून जर त्याला चांगल्याप्रकारे खत पाणी घातले तर ही मुले जागतिक स्तरावरही चमकू शकतात. सुवेतने आपल्या कामगिरीने ते सिद्ध केले आहे. असे अन्य कित्येक सुवेत असतील ज्यांचे गुण वेळीच पारखले आणि त्यांना प्रोत्साहन दिले तर ते सुवेतही राज्यासाठी व देशासाठी अशी पदके आणू शकतात.

टॅग्स :goaगोवा