शहरं
Join us  
Trending Stories
1
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
2
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
3
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
4
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
5
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
6
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
7
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
8
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
9
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
10
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
11
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
12
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
13
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
14
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
15
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
16
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
17
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
18
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
19
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
20
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल

दक्षिण आफ्रिकेचा संघ कायमच बलाढ्य राहिला

By admin | Updated: September 26, 2015 00:06 IST

भारत दौऱ्यावर येणारा दक्षिण आफ्रिकेचा संघ पुर्ण तयारीनिशी येणार असून त्यांचा संघ जबरदस्त आहे. मी खेळत असताना दक्षिण आफ्रिकेचा संघ कायम बलाढ्यच असायाचा

मुंबई : भारत दौऱ्यावर येणारा दक्षिण आफ्रिकेचा संघ पुर्ण तयारीनिशी येणार असून त्यांचा संघ जबरदस्त आहे. मी खेळत असताना दक्षिण आफ्रिकेचा संघ कायम बलाढ्यच असायाचा. त्यामुळे महात्मा गांधी - नेल्सन मंडेला क्रिकेट मालिका अत्यंत अटीतटीची होईल. या मालिकेसाठी मी खुप उत्साहीत आहे, असे माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने सांगितले. मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमावेळी तेंडुलकरने आपले मत मांडले. यावेळी त्याने क्रिकेटमध्ये आलेल्या तंत्रज्ञानाविषयीही सांगितले. तंत्रज्ञानामुळे संपुर्ण क्रिकेट बदलले असून खेळाडूंना आणि क्रिकेटला त्याचा खुप फायदा होत आहे. यामुळे खेळ प्रगत झाल्याचे तेंडुलकर म्हणाला.सध्या क्रिकेटमध्ये झालेल्या तंत्रज्ञानाच्या प्रवेशामुळे खेळ अत्यंत वेगवान आणि ‘स्मार्ट’ झाला असल्याचे सांगताना तेंडुलकर म्हणाला की, मी नवोदित असताना सर्वजण एकत्रित बसून चर्चा करुन रणनिती आखायचे. मात्र नंतर काळ बदलला आणि २००३-०४ च्या सुमारास डे्रसिंगरुममध्ये कॉम्युटरचा प्रवेश झाला. सर्व खेळाडूंच्या रेकॉर्डचा डाटा तयार होऊ लागला. आमच्या मिटींग अधिक स्मार्ट झाल्या. तंत्रज्ञानामुळे रणनिती आखण्यात अधिक मदत झाली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे खेळ प्रेक्षकांच्या जवळ गेला. हॉटस्पॉट, लाइन डिसिजन यामुळे प्रेक्षकांना क्रिकेट अधिक समजू लागले, असे तेंडुलकरने सांगितले. पुर्वी विदेशी दौऱ्यावर कुटंबियांशी व मित्रांशी संपर्क करण्यासाठी विशेष वेळ ठरवावा लागत असे. मोबाईलमुळे आम्ही प्रवासातही कुटुंबीय व मित्रपरिवाराच्या संपर्कात राहू शकलो. यानंतर स्मार्ट फोनने तर क्रांतीच केली. प्रत्येक क्षणी आम्ही संपर्कात राहू लागलो. आमच्या मिटींग देखील स्मार्ट झाल्या आणि खेळाडूही अधिक जागृत राहू लागले, असे तेंडुलकर म्हणाला.नेल्लोरे जिल्हातील कंद्रीगा या दत्तक घेतलेल्या गावामध्ये काम करताना येथील समस्यांची जाणीव झाली. आपल्याला शहरामध्ये अनेक सोयी - सुविधा असतात आणि येथील लोक यापासून वंचित असतात. संपुर्ण देशामध्ये डिजिटल कनेक्शन होणे अत्यंत गरजेचे असून यामुळे प्रगतीला वेग मिळेल, असे दस्तुरखुद्द सचिन तेंडूलकर याने सांगितले. क्रिकेटमध्ये ‘नो शॉर्टकट’भारताचा सध्याचा संघ मजबूत आहे. सर्व खेळाडूंमध्ये गुणवत्ता असून आत्मविश्वास ठासून भरलेला आहे. प्रत्येक खेळाडूच्या क्षमतेची मला जाणीव आहे. मात्र ज्यावेळी क्रिकेटचा विचार येतो तेव्हा त्यात कोणताही शॉर्टकट नसतो याची जाणीव असावी. मेहनत आणी सराव याला पर्याय नाही. भारताचे सर्व खेळाडू खेळाशी एकनिष्ट आहेत, असेही सचिनने यावेळी सांगितले.दक्षिण आफ्रिका संघाविषयी तेंडुलकरने सांगितले की, एबी डीव्हीलियर्स, हाशीम आमला यांच्यासह मॉर्नी मॉर्कल आणि डेल स्टेन यांचे विशेष आव्हान भारतीयांसमोर असेल. इम्रान ताहीरची फिरकी गोलंदाजी भारतीयांसाठी डोकेदुखी ठरु शकेल. त्याच्याकडे निर्णायक खेळ करण्याची क्षमता आहे.-सचिन तेंडूलकर