शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

दक्षिण आफ्रिकेने केला आॅस्ट्रेलियाचा सफाया

By admin | Updated: October 14, 2016 01:02 IST

डेव्हिड वॉर्नरच्या दणकेबाज शतकानंतरही दक्षिण आफ्रिकेने पाचव्या आणि अखेरच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात आॅस्ट्रेलियाचा ३१ धावांनी पराभव

केपटाऊन : डेव्हिड वॉर्नरच्या दणकेबाज शतकानंतरही दक्षिण आफ्रिकेने पाचव्या आणि अखेरच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात आॅस्ट्रेलियाचा ३१ धावांनी पराभव करून मालिकेत ५-० असा सफाया केला.वॉर्नरने १३६ चेंडूंत १७३ धावांची खेळी केली; परंतु दुसऱ्या बाजूने त्याला तोडीची साथ मिळाली नाही. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या ८ बाद ३२७ धावांच्या प्रत्युत्तरात आॅस्ट्रेलियाचा संघ २९६ धावांत सर्व बाद झाला. दक्षिण आफ्रिकेने याआधी पहिला वनडे सामना ६ गडी राखून, दुसरा सामना १४२ धावांनी, तिसरा सामना ४ विकेटनी तर चौथा सामना ६ विकेट राखून जिंकला होता. या पराभवानंतरही आॅस्ट्रेलियाचा संघ आयसीसी एकदिवसीय रँकिंगमध्ये अव्वलस्थानी कायम आहे, तर दक्षिण आफ्रिका २ गुणांनी पिछाडीवर असून, ते दुसऱ्या स्थानी आहेत.त्याआधी रिली रोसेयूने १५६ चेंडूंत १४ चौकार व २ षटकारांसह केलेल्या १२२ धावा आणि त्याने जेपी ड्युमिनीच्या साथीने केलेल्या चौथ्या गड्यासाठीच्या १७८ धावांच्या भागीदारीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने ८ बाद ३२७ अशी विशाल धावसंख्या रचली. आॅस्ट्रेलियाकडून ट्रिमेन आणि मेनी यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले, तर स्कॉट बोलँडने २ गडी बाद केले. जेपी ड्युमिनीने ७५ चेंडूंत ८ चौकारांसह ७३ आणि डेव्हिड मिलरने २९ चेंडूंत ४ चौकारांसह ३९ धावांची तेजतर्रार खेळी केली. आॅस्ट्रेलियाकडून ट्रिमेन आणि मेनी यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. दुसरीकडे, डेव्हिड वॉर्नरला नशिबाची साथ मिळाली. या डावखुऱ्या फलंदाजाला ११ धावांवर कागिसो रबादाच्या चेंडूंवर क्विंटन डिकॉकने जीवदान दिले. वॉर्नरने त्याच्या खेळीत २४ चौकार मारताना आॅस्ट्रेलियाच्या आशा जिवंत ठेवल्या. तो संघाची धावसंख्या २८८ असताना नवव्या फलंदाजाच्या रूपात बाद झाला. तो दुसरी चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात पॉइंट सीमारेषेवरून इम्रान ताहीरच्या थेट फेकीद्वारे धावबाद झाला. वॉर्नरशिवाय ट्रेव्हिस हेड आणि मिशेल मार्श यांनी प्रत्येकी ३५ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून इम्रान ताहीर व काईल एबोट, रबादा यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.