लंडन : जेव्हा मेंटर ख्रिस केर्न्सने संघाचा सहकारी ब्रँडन मॅक्युलम याला फिक्सिंगच्या जाळ्यात गोवण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा केर्न्सचा राग आला होता, असे डॅनियल व्हेट्टोरी याने लंडनच्या एका न्यायालयात सांगितले.केर्न्सने २०१० मध्ये न्यूझीलंड संघाच्या बांगलादेश दौऱ्यात त्याच्यासोबत स्पॉट फिक्सिंगची चर्चा केली होती. मॅक्युलमने ही माहिती आपल्याला दिली असल्याचे व्हेट्टोरीने व्हिडिओ कॉन्फ्रन्सच्या माध्यमातून न्यायालयाला सांगितले.ख्रिस केर्न्सने मॅक्युलमची दोनदा स्पॉटफिक्सिंगविषयी चर्चा केली होती. ही माहिती आपल्याला मॅक्युलमने दिली होती. काईल मिल्सकडूनही हीच गोष्ट ऐकल्याने मी अवाक् झालो होतो आणि मला केर्न्सवर खूप संताप आला होता.’’ तथापि, व्हिट्टोरीने मॅक्युलमला याविषयी आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी समितीला न कळवण्याचे सांगितले होते; परंतु २0११ मध्ये जेव्हा समिती प्रमुख जॉन ऱ्होडस् यांच्याशी मॅक्युलमची भेट झाली होती तेव्हा ते मॅक्युलमसोबतच होते. केर्न्सने याविषयी कधीही चर्चा केली नाही आणि त्यामुळेच आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी आणि सुरक्षा समितीला याविषयीची माहिती दिली नाही आणि असे करण्यास मॅक्युलमला प्रेरितही केले नाही, असे व्हेट्टोरीने सांगितले. २00६ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान आपण आणि केर्न्सने भारतात एका टूथपेस्टची जाहिरात केली होती. त्याबदल्यात काही पैसे मिळाले होते, असेही व्हेट्टोरीने सांगितले.(वृत्तसंस्था)माझे आणि केर्न्सदरम्यान खूप चांगले संबंध होते. आम्ही दोघे चांगले मित्र होतो. जेव्हा मी १९९७ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते तेव्हा तो माझ्या संघाचा सहकारी होता आणि क्रिकेटच्या सुरुवातीच्या दिवसांत त्याने मला खूप मदतही केली. तो माझ्यासाठी एका मेंटरप्रमाणेच होता; परंतु ब्रँडन (मॅक्युलमला) अशा परिस्थितीत गोवण्याची माहिती मिळाली तेव्हा मला खूप धक्का बसला होता.- डॅनियल व्हेट्टोरी
त्यामुळे आला केर्न्सचा राग
By admin | Updated: October 24, 2015 04:14 IST