शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भारताची शान स्मृती मानधना आणि हिमा दासला फोर्ब्सचा मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 17:02 IST

राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या नीरज चोप्राचाही या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे.

नवी दिल्ली : भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे नाव उज्वल करणाऱ्या हिमा दास यांचा फोर्ब्सच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. फोर्ब्सने भारताची '30 अंडर 30' अशी एक यादी तयार केली आहे. या यादीमध्ये स्मृती आणि हिमा यांचा समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या नीरज चोप्राचाही या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे.

फोर्ब्स इंडियाच्या '30 अंडर 30' या आवृत्तीचे हे सहावे वर्ष आहे. या यादीमध्ये खेळाबरोबर एंटरटेनमेंट, मार्केटिंगसहित अन्य काही क्षेत्रांचाही समावेश करण्यात आला आहे. या वर्षीच्या यादीमध्ये एकूण 16 क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव करण्यात आला आहे. या यादीसाठी पहिल्यांदाच उद्योग, उर्जा, मार्केटिंग, मीडिया, कृषी या क्षेत्रांचाही समावेश करण्यात आला आहे. 

स्मृतीची नेत्रदीपक कामगिरीमहाराष्ट्राची कन्या स्मृती मानधनाला सातत्यपूर्ण कामगिरीचे फळ मिळाले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने शनिवारी जाहीर केलेल्या क्रमवारीत स्मृतीने वन डे क्रिकेटमधील महिला फलंदाजांमध्ये अव्वल स्थान पटकावले. तिने तीन स्थानांची झेप घेत अव्वल स्थान गाठले. न्यूझीलंड दौऱ्यात स्मृतीची बॅट चांगलीच तळपली होती. तिने पहिल्या सामन्यात शतकी खेळी करताना जेमिमा रॉड्रीग्जसह 190 धावांची विक्रमी भागीदारी केली होती. 2018 या वर्षातील कामगिरीमुळे तिला आयसीसीने सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूच्या पुरस्कारानेही गौरविले होते.

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत भारताने 2-1 अशा विजय मिळवला आणि स्मृतीने मालिकावीराचा पुरस्कार जिंकला.  स्मृतीने 2018 वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत 15 वन डे सामन्यांत दोन शतकं आणि 8 अर्धशतकं झळकावली. आयसीसीच्या क्रमवारीत स्मृतीने ( 751) 70 गुणांच्या आघाडीसह ऑस्ट्रेलियाच्या एलिसे पेरीला मागे टाकले आहे. ऑस्ट्रेलियाचीच मेग लॅनिंग 76 गुणांच्या पिछाडीसह तिसऱ्या स्थानावर आहे. 

'30 अंडर 30' म्हणजे नेमके कायफोर्ब्सने या यादीमध्ये प्रत्येक देशातील 30 वर्षांखालील युवकांचा सन्मान केला जातो. 30 वर्षांखालील ज्या व्यक्तींनी देदिप्यमान कामगिरी केली आहे, त्यांना या यादीमध्ये प्रवेश दिला जातो.

टॅग्स :Forbesफोर्ब्सHima Dasहिमा दास