शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
3
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
4
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
5
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
6
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
7
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
8
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
9
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
10
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
11
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
12
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
13
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
14
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
15
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
16
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
17
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
18
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
19
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
20
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!

स्मिथची झुंजार खेळी

By admin | Updated: December 27, 2014 02:27 IST

कर्णधार स्टीव्हन स्मिथने झुंजार खेळी करीत सलग तिसऱ्या शतकाकडे वाटचाल सुरू ठेवल्याने भारताविरुद्ध तिस-या कसोटीत

मेलबोर्न : कर्णधार स्टीव्हन स्मिथने झुंजार खेळी करीत सलग तिस-या शतकाकडे वाटचाल सुरू ठेवल्याने भारताविरुद्ध तिसऱ्या कसोटीत पहिल्या दिवसअखेर आॅस्ट्रेलियाला ५ बाद २५९ धावांपर्यंत मजल गाठता आली. भारतीय गोलंदाजही प्रभावी ठरल्यामुळे उभय संघांची कामगिरी समतोल झाली.स्मिथने नाणेफेक जिंकताच फलंदाजीचा निर्णय घेत कलात्मक फटकेबाजीमुळे भारतीय गोलंदाजांना हैराण केले. चढउताराच्या खेळात स्मिथ ७२ धावांवर नाबाद राहिला. डेव्हिड वॉर्नर शून्यावर बाद होताच भारतीय गोटात आनंदाचे वातावरण होते पण ख्रिस रॉजर्स ५७ आणि शेन वाटसन ५२ यांनी अर्धशतके झळकवित दुसऱ्या गड्यासाठी ११५ धावांची भागीदारी केली.यानंतर यजमानांचे तीन गडी झटपट बाद झाल्याने भारताला सामन्यात परतण्याची संधी मिळाली. दुसरीकडे कर्णधाराला समर्थपणे साथ देत ब्रॅड हॅडिन २३ धावांवर नाबाद आहे. भारताकडून उमेश यादव आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी दोन तसेच अश्विनने एक गडी बाद केला. ईशांतनेही टिच्चून मारा केला पण त्याला गडी बाद करता आला नाही. वॉर्नरचा अडथळा दूर सारणाऱ्या भारताने वाटसनला मात्र ३७ धावांवर जीवदान दिले. स्लिपमध्ये धवनने त्याचा झेल सोडला. दुसऱ्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी यजमान फलंदाजांना धावा घेणे कठीण केले होते. पण आधीच्या दोन सामन्यात दोन शतके आणि अर्धशतकासह ३७५ धावा काढणाऱ्या २५ वर्षाच्या स्मिथने संयमी खेळ केला. स्मिथने आजच दहावे अर्धशतक गाठले शिवाय एका वर्षांत हजार धावांचाही पल्ला गाठला.वाटसन आणि रॉजर्स यांनी जी ११५ धावांची भागीदारी केली त्यात रॉजर्सने सलग तिसरे व एकूण आठवे अर्धशतक साजरे केले. वाटसनने नऊ डावांत पहिल्या अर्धशतकाची नोंद केली. आॅस्ट्रेलियाने या सामन्यासाठी संघात दोन बदल केले. मिशेल स्टाकरऐवजी रेयॉन हॅरिस आणि मिशेल मार्शऐवजी ज्यो बर्न्सला खेळविण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघातही दोन बदल करण्यात आले.वरुण अ‍ॅरोनचे स्थान वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने घेतले तर सलग अपयशी ठरलेल्या रोहित शर्मा याला वगळून लोकेश राहुलला कसोटी पदार्पणाची संधी देण्यात आली. आॅस्ट्रेलियाने अ‍ॅडिलेड येथे पहिला सामना ४८ धावांनी आणि ब्रिस्बेनचा दुसरा सामना चार गड्यांनी जिंकून चार सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी संपादन केली.(वृत्तसंस्था)