शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

आयपीएलमुळे ‘स्लेजिंग’ कमी

By admin | Updated: November 3, 2015 04:00 IST

सभ्य लोकांचा खेळ असलेल्या क्रिकेटमध्ये खिलाडूवृत्ती कायम राखण्यावर जोर देताना भारताचा मर्यादित षटकांच्या सामन्यांतील कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आयपीएलमुळे जगातील

नवी दिल्ली : सभ्य लोकांचा खेळ असलेल्या क्रिकेटमध्ये खिलाडूवृत्ती कायम राखण्यावर जोर देताना भारताचा मर्यादित षटकांच्या सामन्यांतील कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आयपीएलमुळे जगातील क्रिकेटपटू एकत्र येण्यास मदत झाली आणि क्रिकेटमधून ‘स्लेजिंग’ला दूर सारण्यास मदत मिळाली, असे मत व्यक्त केले आहे. ‘कॅप्टन कुल’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या धोनीच्या मते आयपीएल आणि जगात अन्य देशांमध्ये आयोजित होणाऱ्या या प्रकारच्या टी-२० लीग स्पर्धांमुळे आंतरराष्ट्रीय सामन्यांदरम्यान मैदानावर चांगला माहोल तयार करण्यास मदत मिळाली आहे. एका व्यावसायिक कार्यक्रमानिमित्त विंडीजचा फलंदाज ख्रिस गेलसोबत व्यासपीठावर उपस्थित असलेला धोनी म्हणाला,‘आम्ही सभ्य लोकांचा खेळ खेळतो. प्रत्येक खेळाडू विजयासाठी इच्छुक असतो. पण हे सर्व काही योग्य पद्धतीने घडायला पाहिजे. आयपीएलमुळे स्लेजिंगला क्रिकेटपासून दूर केले. मैत्रीमध्ये हास्यविनोद सुखावह असतात आणि टी-२० लीगमुळे हे सर्व काही शक्य झाले. अयपीएलमुळे स्लेजिंग संपविण्यास बरीच मदत झाली आहे. आयपीएल स्पर्धेच्या निमित्ताने वेगवेगळी संस्कृती असलेले क्रिकेटपटू एकच ड्रेसिंग रूम शेअर करीत असल्यामुळे खेळाडूंमध्ये ऋणानुबंध निर्माण झाले. मला कदाचित ज्यांच्यासोबत चर्चा करण्याची संधीही मिळाली नसती, अशा अनेक व्यक्तींच्या जवळ येण्याची संधी केवळ आयपीएल स्पर्धेमुळे मिळाली.’भारतीय कर्णधारासोबत सलोख्याचे संबंध असलेल्या गेलने या वेळी व्यासपीठावर यष्टिरक्षक फलंदाज असलेल्या धोनीच्या ‘हेलिकॉप्टर शॉट’ची नक्कल केली. आयपीएलमुळे खेळाडूंदरम्यानचा तणाव कमी झाला असल्याचे गेलने या वेळी स्पष्ट केले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा सलामीवीर फलंदाज असलेला गेल म्हणाला, ‘आयपीएलबाबत धोनीच्या मतासोबत सहमत आहो. आयपीएलमुळे क्रिकेट खेळाडूंदरम्यान संबंध सुधारण्यास मदत मिळाली. मैत्रीमुळे हास्यविनोद होत असतात. मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या किरोन पोलार्डसोबत मी नेहमी याचा आनंद घेतो.’ आयपीएलमुळे मैत्री झाल्याचे उदाहरण देताना गेल म्हणाला, ‘आयपीएल स्पर्धेमुळे मला आरसीबीचे प्रतिनिधित्व करणारा आॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कला जाणून घेण्याची संधी मिळाली. ड्रेसिंग रूममध्ये स्टार्क वेगळाच खेळाडू आहे. तो शांत व फार कमी बोलणारा खेळाडू आहे.’गेलने क्रिकेटव्यतिरिक्त जमैकाचा स्टार धावपटू उसेन बोल्टसोबत असलेल्या मैत्रीबाबत भाष्य केले. गेलने या वेळी गमतीने म्हटले की, ‘एक दिवस १०० मीटर दौड स्पर्धेत या महान धावपटूला नक्कीच हरविणार.’ (वृत्तसंस्था)आयपीएल स्पर्धेदरम्यान माझ्या संघाची रणनीती अन्य संघातील खेळाडूंना कळू नये म्हणून भारतीय खेळाडूंसोबतही चर्चा करीत नाही. स्पर्धेदरम्यान या सर्व बाबींचे भान ठेवावे लागते; पण आयपीएल स्पर्धेमुळे अनेक खेळाडूंसोबत माझे संबंध सुधारण्यास मदत मिळाली.- महेंद्रसिंह धोनी