शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

‘हॅट्ट्रिक’साठी सिंधूची रोज आठ तासांची मेहनत; तीन तास कोर्टवर, तीन तास जिममध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 10:36 IST

‘सगळे एका रात्रीत ‘स्टार’ बनू शकत नाहीत. कधी लवकर यश मिळते कधी थांबावे लागते.

उमेश जाधव - पुणे: सन २०१६ मधील रिओ आणि यंदाच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सलग दोन पदके जिंकून इतिहास घडवणाऱ्या बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूवर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. सिंधू मात्र त्यात मश्गुल झालेली नाही. तिची नजर आता तिसऱ्या म्हणजेच सन २०२४ मध्ये पॅरिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिकवर आहे. या ऑलिम्पिकमध्ये पदकांची ‘हॅट‌्ट्रिक’ साधण्यासाठी ती दररोज आठ तास मेहनत करत आहे.

बुधवारी पुण्यात आलेल्या सिंधूनेच याची माहिती दिली. ती म्हणाली की, दररोज सकाळी तीन तास बॅडमिंटनचा सराव चालू आहे. तंदुरुस्ती टिकवण्यासाठी रोज संध्याकाळी व्यायामशाळेत तीन तास घाम गाळते. याशिवाय रोज दोन तास धावणे आणि ‘वेट ट्रेनिंग’ही करते. मानसिक स्वास्थ्य मजबूत ठेवण्यासाठी योग, ध्यानधारणा यावरही तिचा भर आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी तिने आता घरातच ‘जिम’ तयार केली आहे. दरम्यान, ज्युनिअर स्पर्धा खेळण्यासाठ अनेकदा पुण्यात येऊन गेल्याची आठवणही सिंधूने या वेळी  सांगितली. ‘अनेक वर्षांचा नियमित सराव आणि कठोर मेहनतीमुळेच सलग दुसरे ऑलिम्पिक पदक मिळवणे शक्य झाले.  सध्या पदक जिंकल्याचा आनंद साजरा करतेय. तसेच आगामी डेन्मार्क आणि फ्रान्स येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठीही कसून तयारी चालू केली आहे,’ असे सिंधूने स्पष्ट केले.

एका रात्रीत यश?‘सगळे एका रात्रीत ‘स्टार’ बनू शकत नाहीत. कधी लवकर यश मिळते कधी थांबावे लागते. या गोष्टी आईवडिलांनी समजून घेण्याची गरज आहे. एका पदकामागे काही महिने किंवा एखाद्या वर्षांची मेहनत नसते तर त्यासाठी अनेक वर्षे कठोर परिश्रम करावे लागतात. पालकांनी मुलांच्या क्षमतेवर विश्वास ठेवून त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. मुलांच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी पालकांनाही योगदान द्यावे लागते.’              -पी. व्ही. सिंधू

‘उपांत्य’ पराभव अजून सलतोय‘उपांत्य सामन्यातील पराभवाने मी खूप दु:खी झाले. त्यानंतर ऑलिम्पिक कांस्यपदकाच्या लढतीसाठी आईवडील, प्रशिक्षक यांनी मला प्रोत्साहन दिले. उपांत्य लढतीतला पराभव हा इतिहास झाला आहे. आता हा सामना जिंकायचाच,’ असे प्रशिक्षकांनी सांगितले. त्यानंतर या लढतीत स्वत:ला झोकून दिल्याची आठवण तिने सांगितली.  

टॅग्स :PV Sindhuपी. व्ही. सिंधूOlympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021Puneपुणे