शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

स्विस ओपनमध्ये सिंधू विजयी, प्रणय पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 05:15 IST

प्रणय पाच वर्षांनी पहिला अंतिम सामना खेळत होता

बासेल :  बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हिने स्वीस ओपन सुपर ३०० स्पर्धेत रविवारी येथे  थायलंडच्या बुसानन ओंगबामरंगफआनला पराभूत करत  विजेतेपद पटकावले.    तसेच पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात एच.एस. प्रणय याला पराभवाचा सामना करावा लागला.  सिंधूने बुसाननला ४९ मिनिटे चाललेल्या सामन्यात २१-१६, २१-१८ असे पराभूत केले.  प्रणयला इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीकडून ४८ मिनिटात १२-२१, १८-२१ असा पराभूत झाला. प्रणय पाच वर्षांनी पहिला अंतिम सामना खेळत होता. प्रणयला २०१८ पासून प्रकृतीच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.

सिंधूने याच ठिकाणी २०१९ च्या विश्व चॅम्पियशीपचे सुवर्ण पदक जिंकले होते. तिने यावर्षीच सैयद मोदी स्पर्धेचे जेतेपद पटकावले.

हैदराबादच्या या खेळाडूने या सामन्यात आक्रमक सुरुवात केली आणि ३-० अशी आघाडी घेतली. बुसानने पुनरागमन करत स्कोअर ७-७ असा केला. मात्र बुसानन ही सिंधूला टक्कर देण्यात अपयशी ठरली. दुसऱ्या गेममध्ये सिंधूने ५-० अशी आघाडी घेतली आणि १८-४ असा स्कोअर केला. नंतर सहजतेने सामना जिंकला. 

प्रणय पाच वर्षांनी पहिला अंतिम सामना खेळत होता. २९ वर्षाच्या या खेळाडूला २०१८ पासून प्रकृतीच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.स्पर्धेत शानदार लयीत असणाऱ्या प्रणयला रविवारी जोनाथन विरोधात योग्य पद्धतीने खेळ करता आला नाही. प्रणयने सामन्याच्या सुरुवातीला ५-५ आणि ८-८ अशी बरोबरी साधली मात्र जोनाथनने टक्कर दिली आणि नंतर त्याने प्रणयला पुनरागमनाची संधीच दिली नाही.   प्रणयने चुका केल्या आणि तो दबावातच राहिला. दुसऱ्या गेममध्येही ब्रेकनंतर प्रणयने १३-१३ अशी बरोबरी साधली होती.  मात्र जोनाथनने भारतीय खेळाडूची लय तोडली आणि १९-१४ अशी आघाडी घेतली आणि सामना जिंकला. 

टॅग्स :PV Sindhuपी. व्ही. सिंधूBadmintonBadminton