स्विस ओपनमध्ये सिंधू विजयी, प्रणय पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 05:15 AM2022-03-28T05:15:00+5:302022-03-28T05:15:30+5:30

प्रणय पाच वर्षांनी पहिला अंतिम सामना खेळत होता

Sindhu wins Swiss Open, loses romance | स्विस ओपनमध्ये सिंधू विजयी, प्रणय पराभूत

स्विस ओपनमध्ये सिंधू विजयी, प्रणय पराभूत

Next

बासेल :  बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हिने स्वीस ओपन सुपर ३०० स्पर्धेत रविवारी येथे  थायलंडच्या बुसानन ओंगबामरंगफआनला पराभूत करत  विजेतेपद पटकावले.    तसेच पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात एच.एस. प्रणय याला पराभवाचा सामना करावा लागला.  सिंधूने बुसाननला ४९ मिनिटे चाललेल्या सामन्यात २१-१६, २१-१८ असे पराभूत केले.  प्रणयला इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीकडून ४८ मिनिटात १२-२१, १८-२१ असा पराभूत झाला. प्रणय पाच वर्षांनी पहिला अंतिम सामना खेळत होता. प्रणयला २०१८ पासून प्रकृतीच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.

सिंधूने याच ठिकाणी २०१९ च्या विश्व चॅम्पियशीपचे सुवर्ण पदक जिंकले होते. तिने यावर्षीच सैयद मोदी स्पर्धेचे जेतेपद पटकावले.

हैदराबादच्या या खेळाडूने या सामन्यात आक्रमक सुरुवात केली आणि ३-० अशी आघाडी घेतली. बुसानने पुनरागमन करत स्कोअर ७-७ असा केला. मात्र बुसानन ही सिंधूला टक्कर देण्यात अपयशी ठरली. दुसऱ्या गेममध्ये सिंधूने ५-० अशी आघाडी घेतली आणि १८-४ असा स्कोअर केला. नंतर सहजतेने सामना जिंकला. 

प्रणय पाच वर्षांनी पहिला अंतिम सामना खेळत होता. २९ वर्षाच्या या खेळाडूला २०१८ पासून प्रकृतीच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
स्पर्धेत शानदार लयीत असणाऱ्या प्रणयला रविवारी जोनाथन विरोधात योग्य पद्धतीने खेळ करता आला नाही. प्रणयने सामन्याच्या सुरुवातीला ५-५ आणि ८-८ अशी बरोबरी साधली मात्र जोनाथनने टक्कर दिली आणि नंतर त्याने प्रणयला पुनरागमनाची संधीच दिली नाही.   प्रणयने चुका केल्या आणि तो दबावातच राहिला. दुसऱ्या गेममध्येही ब्रेकनंतर प्रणयने १३-१३ अशी बरोबरी साधली होती.  मात्र जोनाथनने भारतीय खेळाडूची लय तोडली आणि १९-१४ अशी आघाडी घेतली आणि सामना जिंकला.
 

Web Title: Sindhu wins Swiss Open, loses romance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.