नेमबाजी विश्वचषक : मनू भाकरने साधला सुवर्णवेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 02:21 AM2018-03-06T02:21:12+5:302018-03-06T02:21:12+5:30

दोन वेळा विश्वविजेती राहिलेली यजमान देशाची अलेक्झांड्रा जावाला हिला नमवून भारतीय नेमबाज मनू भाकर हिने मेक्सिकोतील गुआदालाजरा येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सोमवारी दहा मीटर एअर पिस्तुलचे सुवर्ण जिंकले. त्याचवेळी पुरुष गटात रवी कुमारला कांस्यवर समाधान मानावे लागले.

 Shooting World Cup: Manu Bhakaran to lead gold medal | नेमबाजी विश्वचषक : मनू भाकरने साधला सुवर्णवेध

नेमबाजी विश्वचषक : मनू भाकरने साधला सुवर्णवेध

Next

नवी दिल्ली - दोन वेळा विश्वविजेती राहिलेली यजमान देशाची अलेक्झांड्रा जावाला हिला नमवून भारतीय नेमबाज मनू भाकर हिने मेक्सिकोतील गुआदालाजरा येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सोमवारी दहा मीटर एअर पिस्तुलचे सुवर्ण जिंकले. त्याचवेळी पुरुष गटात रवी कुमारला कांस्यवर समाधान मानावे लागले.
२४ शॉटच्या अंतिम लढतीत मनूने २३७.५ गुणांची कमाई केली. जावालाने २३७.१ गुण मिळविले. फ्रान्सची सेव्हिले गोबरविले हिने कांस्य पदक मिळविले.
अकरावीला शिकणाºया मनूने अलीकडेच २०१८ च्या ब्यूनस आयर्स युवा आॅलिम्पिकसाठी कोटा प्राप्त केला. आता सुवर्ण जिंकून तिने सत्रातील पहिल्या विश्वचषकात देशासाठी शानदार कामगिरी केली आहे.
याआधी रवी कुमार याने पुरुषांच्या दहा मीटर एअर रायफल स्पर्धेत कांस्य पदक जिंकून विश्वचषकात स्वत:च्या पदकाचे खाते उघडले. रवीने मागच्यावर्षी तीन फायनलमध्ये स्थान मिळविले होते. पण पदक मात्र मिळाले नव्हते. त्याने २२६.४ गुणांची कमाई केली.
तिसºया आणि चौथ्या स्थानाच्या चढाओढीत रवीने आपलाच सहकारी दीपक कुमारला शूटआऊटमध्ये मागे टाकले. त्याचवेळी हंगेरीचा प्रतिभावान युवा खेळाडू आणि जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला इस्तवान पेनी याने २४९.५ गुणांसह सुवर्ण तसेच आॅस्ट्रियाचा अलेक्झांडर शिर्मिल याने २४८.७ गुणांसह रौप्यची कमाई केली.
स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी शाहजर रिझवी आणि जीतू राय यांनी पुरुषांच्या दहा मीटर पिस्तुल प्रकारात क्रमश: सुवर्ण आणि कांस्य पदक जिंकले होते. मेहुली घोष हिने महिलांच्या दहा मीटर एअर रायफल प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली होती. (वृत्तसंस्था)

कोण आहे मनू भाकर...

हरियाणातील दादरी येथे वास्तव्य करणारी १६ वर्षीय मनू भाकर इयत्ता अकरावीला शिकते. दोन वर्षांपूर्वी तिने नेमबाजी सुरू केली.

मनूने जपानमध्ये झालेल्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये रौप्य जिंकले होते. गतवर्षी मनूने दोन राष्टÑीय विक्रमांची नोंद केली. तीने बॉक्सिंग व मार्शल आर्टमध्येही प्राविण्य मिळविले आहे. मणिपूरचा मार्शल आर्ट प्रकार ‘थांगता’ हा खेळ तिला अवगत असून जखमी झाल्यामुळे आईने तिला बॉक्सिंग करण्यास मनाई केली.

मार्शल आर्ट प्रकारातील थांगता खेळामध्ये जखमी झाल्यानंतर मनूने नेमबाजीकडे आपले लक्ष केंद्रीत केले.
मनूने सुवर्ण पदकाच्या रुपाने पहिल ेविश्वचषक पदक पटकावले.

सुवर्ण जिंकून मी फार आनंदी आहे. विश्वचषकातील माझे हे पहिलेच पदक आहे. आगामी स्पर्धांमध्ये याहून चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न असेल.
- मनू भाकर,
महिला नेमबाज.

युवा भारतीय नेमबाजांची पाहता ही चांगली सुरुवात म्हणावी लागेल. भविष्यात भारतीय नेमबाजी जगात वर्चस्व मिळवेल, याचे हे संकेत आहेत. मनू आणि रवी मागच्या वर्षीपासून सातत्यपूर्ण कामगिरी करीत आहेत.
- रानिंदरसिंग,
अध्यक्ष एनआरएआय.

Web Title:  Shooting World Cup: Manu Bhakaran to lead gold medal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sportsक्रीडा