शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

आमदार- नगरसेवक चषक कबड्डी : शिव मराठा आणि शूर संभाजी यांच्यात कुमार गटाची अंतिम झुंज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2018 15:04 IST

शिव मराठा स्पोर्ट्स क्लब (सांताक्रूझ) आणि शूर संभाजी मंडळ (कुर्ला) या दोन बलाढ्य संघांमध्ये कुमार गटाची अंतिम झुंज रंगणार आहे.

ठळक मुद्देशिव मराठा स्पोर्ट्स क्लब (सांताक्रूझ) आणि शूर संभाजी मंडळ (कुर्ला) या संघांमध्ये कुमार गटाची अंतिम लढतशूर संभाजी संघाने सुभाष उत्कर्षवर मिळवला विजयमहिला गटात गोरेगावच्या संघर्ष क्रीडा मंडळाचे वर्चस्व

मुंबईः येथे सुरु असलेल्या ओम भारत क्रीडा मंडळ आयोजित आमदार – नगरसेवक चषक कबड्डी स्पर्धेत शिव मराठा स्पोर्ट्स क्लब (सांताक्रूझ) आणि शूर संभाजी मंडळ (कुर्ला) या दोन बलाढ्य संघांमध्ये कुमार गटाची अंतिम झुंज रंगणार आहे. शूर संभाजीने उपांत्य फेरीच्या रोमहर्षक लढतीत सांताक्रूझच्या सुभाष उत्कर्ष संघाला ३०-२१ असे नमवले. सामन्याच्या पहिल्या सत्रात शूर संभाजीने सन्नी यादवच्या पल्लेदार चढाया आणि नवीन पैडीकलवा याच्या अप्रतिम पकडी यामुळे सुभाष उत्कर्षवर झटपट लोन देत १०-४ अशी आघाडी घेतली. मात्र त्यानंतर इलान वास्कर याच्या झंझावाती चढाया आणि ईशराईत वास्करच्या पकडी  या बंधूंच्या आक्रमक खेळाने त्यांनी लोणची परतफेड केली.  मध्यंतराला शूर संभाजी संघाकडे १३-१२ अशी नाममात्र एका गुणाची आघाडी होती, शेवटच्या चार मिनिटापर्यंत उभय संघात चांगलाच संघर्ष पहावयास मिळाला. मात्र अखेर शूर संभाजी संघाने ३०-२१ अशी बाजी मारली. 

महिला गटात गोरेगावच्या संघर्ष क्रीडा मंडळाने नवख्या गोरखनाथ संघावर २९-१४ असा आरामात विजय मिळविला असला तरी गोरखनाथ संघाची छोट्या चणीची काव्या बाठे हिचा चढाई-पकडीचा बेडर खेळ तसेच मानसी चिकणे हिच्या चढाया यांना प्रेक्षकांनी मनमुराद दाद दिली. संघर्षच्या यशात अश्विनी कांबळे हिच्या चढाया, अश्विनी घाणेकरच्या पकडी यांचा मोलाचा वाटा होता. आता  उपांत्य फेरीत संघर्ष विरुद्ध बलाढ्य महात्मा गांधी आणि चेंबूर क्रीडा केंद्र विरुद्ध  बोरिवलीचा ओम नवमहाराष्ट्र संघ अशा चुरशीच्या लढती रंगणार आहेत. 

प्रथम श्रेणी पुरुष गटातील लढतीत नवमहाराष्ट्र मंडळ (बोरीवली) संघाने स्फूर्ती क्रीडा मंडळावर ३०-१५ असा विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. जबरदस्त ताकदीच्या नितेश मोरेच्या आक्रमक चढायामुळे नवमहाराष्ट्र मंडळाने पहिल्या सत्रातच २२-९ अशी मोठी आघाडी घेत सामन्याचा निकाल स्पष्ट केला. नितेशला केतन कुलवंकरने अप्रतिम पकडी करीत छान साथ दिली. स्फूर्ती संघासाठी सुनील यादव आणि संदेश वरलकर यांनी चांगला खेळ केला. आता उपांत्य फेरीत नवमहाराष्ट्र मंडळ विरुद्ध उत्कर्ष आणि साहसी विरुद्ध जॉली अशा लढती होतील. 

टॅग्स :Kabaddiकबड्डी