Harriet Dart Lois Boisson deodorant Tennis: ब्रिटिश टेनिसपटू हॅरियट डार्टने आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूच्या अंगाला दुर्गंधी येत असल्याचे पंचांना सांगून तिला सामन्याच्या दरम्यान डीओ वापरण्यास सांगितले. या प्रकरणी तिने नंतर माफी मागितली आहे. फ्रेंच ओपनच्या तयारीसाठी महत्त्वाची असलेली क्ले कोर्ट स्पर्धा रूएन ओपनच्या पहिल्या फेरीत डार्ट फ्रान्सची खेळाडू लोइस बोइसनकडून ०-६, ३-६ अशी पराभूत झाली. सामन्यात पहिल्या सेटनंतर हा विचित्र किस्सा घडला.
नेमके काय घडले?
सामन्याच्या दरम्यान बाजू बदलताना डार्टने पंचांना म्हटले की, 'तुम्ही बोइसनला डीओ लावण्यास सांगू शकता का? कारण तिच्या अंगाची खूप दुर्गंधी येत आहे. हे संभाषण मायक्रोफोनवर नोंदले गेले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल झाले.
घडलेल्या प्रकाराबाबत मागितली माफी
यानंतर डार्टने इन्स्टाग्रामवर माफी मागितली. डार्ट म्हणाली की, 'ती क्षणिक टिप्पणी होती, ज्याबद्दल मला खरोखर वाईट वाटते. मला बोइसनबद्दल खूप आदर आहे आणि आज ती ज्या पद्धतीने खेळली, त्यातून मी नक्कीच शिकेन.'