शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शैली सिंग लांब उडीच्या अंतिम फेरीत दाखल, २० वर्षांखालील जागतिक ॲथलेटिक्स 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2021 09:04 IST

Shaili Singh : १७ वर्षीय शैलीला भारताची भविष्यातील स्टार मानले जात आहे. तिने महिलांच्या लांबउडी ब गटात आपल्या तिसऱ्या आणि अंतिम प्रयत्नात सर्वोत्तम प्रदर्शन केले. दुसऱ्या प्रयत्नात शैलीने ५.९८ मीटरची उडी घेतली होती. 

नैरोबी : भारताची लांब उडीतील उदयोन्मुख खेळाडू शैली सिंग हिने आपल्या लौकिकानुसार खेळ करताना २० वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. पात्रता फेरीत अव्वल राहिलेल्या शैलीने ६.४० मीटरची उडी घेत सर्वांनाच प्रभावित केले.१७ वर्षीय शैलीला भारताची भविष्यातील स्टार मानले जात आहे. तिने महिलांच्या लांबउडी ब गटात आपल्या तिसऱ्या आणि अंतिम प्रयत्नात सर्वोत्तम प्रदर्शन केले. दुसऱ्या प्रयत्नात शैलीने ५.९८ मीटरची उडी घेतली होती. या कामगिरीनंतर शैलीला सुवर्ण पदकाची संभाव्य विजेती मानले जात असले, तरी अंतिम फेरी मात्र अत्यंत अटीतटीची रंगेल. कारण यामध्ये आधीच जगातील सर्वोत्तम खेळाडूंनी प्रवेश केलेला आहे. ६ त्यामुळे पदकासाठी शैलीला आपला सर्वोत्तम खेळ करावा लागेल.स्वीडनच्या १८ वर्षीय माजा असकागने अ गटात अव्वल राहताना ६.३९ मीटरची उडी घेतली. एकूण क्रमवारीत ती दुसऱ्या स्थानी                 राहिली. याशिवाय, ब्राझीलची लिसांद्रा कम्पोस (६.३६ मीटर), जमैकाची शांते फोरमॅन (६.२७ मीटर) आणि युक्रेनची मारिया होरिलोवा (६.२४ मीटर) यांनीही अंतिम फेरी गाठली असून, यांच्याकडून शैलीला कडवी टक्कर मिळेल.

कोण आहे शैली?झाशीमध्ये जन्मलेल्या शैलीला तिच्या आईने मोठे केले. कपडे शिवून उदरनिर्वाह करणाऱ्या शैलीच्या आईने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शैलीला लहानाचे मोठे केले. बंगळुरू येथील भारताची दिग्गज लांब उडीपटू अंजूबॉबी जॉर्ज हिच्या अकादमीत शैली प्रशिक्षण घेते. अंजूचे पती बॉबी जॉर्ज हे शैलीचे प्रशिक्षक असून, शैलीने जूनमध्ये ६.४८ मीटरची उडी घेत राष्ट्रीय वरिष्ठ आंतरराज्य अजिंक्यपद स्पर्धा जिंकली होती.