शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

भारत व न्यूझीलंड हॉकी संघांदरम्यान सहा कसोटी सामन्यांची मालिका

By admin | Updated: September 22, 2015 23:56 IST

पुढील वर्षी होणाऱ्या आॅलिम्पिक स्पर्धेच्या तयारीसाठी भारतीय हॉकी संघ न्यूझीलंडविरुद्ध २ ते ११ आॅक्टोबर या कालावधीत आॅकलंड, नेल्सन आणि ख्राईस्टचर्चमध्ये सहा कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे

नवी दिल्ली : पुढील वर्षी होणाऱ्या आॅलिम्पिक स्पर्धेच्या तयारीसाठी भारतीय हॉकी संघ न्यूझीलंडविरुद्ध २ ते ११ आॅक्टोबर या कालावधीत आॅकलंड, नेल्सन आणि ख्राईस्टचर्चमध्ये सहा कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. हॉकी इंडियाने स्पष्ट केले की, ‘‘भारतीय संघ न्यूझीलंड ‘अ’ संघाविरुद्ध पहिले दोन सामने खेळणार असून, त्यानंतर चार सामने न्यूझीलंड सिनिअर पुरुष संघाविरुद्ध खेळणार आहे.’’भारतासाठी हा दौरा डिसेंबर महिन्यात रायपूरमध्ये होणाऱ्या एफआयएच विश्व हॉकी लीग फायनलच्या तयारीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. दुसऱ्या बाजूचा विचार करता न्यूझीलंड आगामी ओशियाना कप स्पर्धेसाठी तयारी करीत आहे. या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारावर त्यांना २०१६च्या रिओ आॅलिम्पिकसाठी स्थान निश्चित करण्याची संधी आहे. आॅगस्ट महिन्यात भारतीय संघाने युरोप दौऱ्यात फ्रान्स व स्पेनचा पराभव केला होता. जून २०१५मध्ये न्यूझीलंडला एफआयएच विश्व लीग सेमीफायनलमध्ये सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्यांच्याकडे आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळविण्याची संधी आहे, पण त्यासाठी त्यांना ओशियाना कप २०१५ या स्पर्धेत जेतेपद पटकवावे लागेल. हॉकी इंडियाचे सचिव मोहंमद मुश्ताक अहमद यांनी या दौऱ्याबाबत सांगितले की, ‘‘आगामी स्पर्धांचा विचार करता ही मालिका महत्त्वाची आहे. यामुळे आम्हाला प्रतिस्पर्धी संघांच्या खेळाच्या बदललेल्या शैलीची कल्पना येईल.’’न्यूझीलंड हॉकीचे मुख्य कार्यकारी माल्कम हॅरिस म्हणाले, ‘‘आम्ही या मालिकेबाबत उत्सुक आहोत. गेल्या सहा वर्षांच्या कालावधीत भारतीय पुरुष हॉकी संघ प्रथमच न्यूझीलंड दौऱ्यावर येत आहे. आम्ही चमकदार कामगिरी करण्यास उत्सुक आहोत.’’ (वृत्तसंस्था)