शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

सेरेना विल्यम्सची चौथ्यांदा बाजी

By admin | Updated: April 20, 2016 03:22 IST

जागतिक टेनिस क्रमवारीतील अव्वल पुरुष खेळाडू सर्बियाचा नोव्हाक जोकोविच याने सलग दुसऱ्या वर्षी प्रतिष्ठेचा लॉरियस जागतिक क्रीडा पुरस्कारावर कब्जा केला

बर्लिन : जागतिक टेनिस क्रमवारीतील अव्वल पुरुष खेळाडू सर्बियाचा नोव्हाक जोकोविच याने सलग दुसऱ्या वर्षी प्रतिष्ठेचा लॉरियस जागतिक क्रीडा पुरस्कारावर कब्जा केला. त्याच वेळी दुसऱ्या बाजूला अव्वल महिला टेनिसपटू अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने विक्रमी चौथ्यांदा हा पुरस्कार पटकावला आहे. नुकताच झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यामध्ये जगातील विविध खेळांतील दिग्गज खेळाडूंना २०१५मध्ये केलेल्या कामगिरीनुसार गौरविण्यात आले. जोकोविचला सलग दुसऱ्यांदा आणि एकूण तिसऱ्यांदा ‘जगातील सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू’ पुरस्काराने गौरविण्यात आले. याच वेळी सेरेनाला चौथ्यांदा ‘जगातील सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू’ पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. सेरेनाने गतवर्षी जबरदस्त कामगिरी करताना ३ ग्रँडस्लॅम पटकावण्याचा पराक्रम केला होता.व्यावसायिक फुटबॉलपटू हॉलंडचे जोहान क्रीफ यांना मरणोत्तर ‘स्पिरीट आॅफ स्पोटर््स’ पुरस्काराने गौरविण्यात आले. क्रीफ यांचे मार्च महिन्यात निधन झाले. क्रीफ यांचे पुत्र जॉर्डी यांनी त्यांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. या दिमाखदार सोहळ्यानंतर लॉरियस अ‍ॅकॅडमीचे सदस्य आणि जोकोविचचे प्रशिक्षक माजी दिग्गज टेनिसपटू बोरिस बेकर यांनी सांगितले, ‘‘जोकोविचसाठी २०१५ वर्ष खूप चांगले ठरले. त्याने ८८ पैकी ८२ सामने जिंकताना चारपैकी तीन ग्रँडस्लॅमवर कब्जा केला. तसेच, फ्रेंच ओपनमध्येही फायनलमध्ये धडक मारली. यासह त्याने अन्य सात स्पर्धांतही बाजी मारली. खूप कमी खेळाडू अशा प्रकारचे सातत्य राखण्यात यशस्वी ठरतात.’’ या वेळी रग्बी खेळातील उल्लेखनीय कामगिरीसाठीही अनेक खेळाडूंना पुरस्कार मिळाले. यामध्ये बलाढ्य ‘आॅल ब्लॅक’ संघाला सर्वोत्तम संघ म्हणून गौरविण्यात आले. तसेच, वर्ल्डकप स्पर्धेतील यशस्वी कामगिरीनंतर डैन कार्टरला ‘वर्षातील सर्वोत्तम पुनरागमन’ पुरस्कार देऊन सम्मानित करण्यात आले. अन्य खेळांमध्ये जागतिक क्रमवारीतील द्वितीय गोल्फर अमेरिकेचा जॉर्डन स्पीथ याला ‘ब्रेक थ्रू आॅफ द इयर’ आणि आॅलिम्पिक ट्रायथलन सुवर्णविजेता जर्मनीचा जैन फ्रोडैनोला ‘अ‍ॅक्शन स्पोटर््स अ‍ॅवॉर्ड’ प्रदान करण्यात आला.