शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर एअर इंडियाचा संप मिटला, हकालपट्टी झालेल्या २५ कर्मचाऱ्यांनाही परत कामावर घेतले
2
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
3
एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे; हकालपट्टी झालेल्या कर्मचाऱ्यांना परत कामावर घेणार...
4
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
5
'...तर हिंदूंसाठी एकही देश शिल्लक राहणार नाही'; मुस्लीम लोकसंख्या वाढीवरून भाजपचा काँग्रेसवर निशाणा
6
फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 8 ठार, 3 गंभीर; शिवकाशीत भीषण दुर्घटना
7
प्रज्वल रेवण्णाविरोधात ७०० महिलांनी तक्रार केलीय का? NCW ने सांगितलं यामागील सत्य...
8
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
9
Who is Vidwath Kaverappa? १७व्या वर्षापर्यंत हॉकी खेळला अन् मग क्रिकेटकडे वळला... त्याने फॅफ, विल जॅक्सला पाठवले मागे
10
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
11
"आम्हाला रस्त्यावर आणून तू विदेशात स्थायिक", पालकांची ४ पानी सुसाईड नोट, डोळ्यात येईल पाणी
12
संजू सॅमसनला बाद ठरवणाऱ्या Controversial  निर्णयाचा नवा Video, अखेर सत्य समोर आलेच... 
13
'सिकंदर' ची घोषणा झाल्यानंतर सलमान-रश्मिकाचा जुना व्हिडिओ व्हायरल, भाईजानचं तेलुगू ऐका!
14
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 
15
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
16
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
17
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
18
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध
19
विराट कोहलीला पंजाबविरूद्धच्या सामन्यात मोठ्या विक्रमाची संधी; ठरू शकतो पहिलाच भारतीय!
20
मुग्धा गोडसे भडकली, मॉलमधील एका कॅफेत आईला मिळाली वाईट वागणूक; प्रकरण काय?

सेरेना, शारापोव्हा,मरे, वावरिंका क्वार्टर फायनलमध्ये

By admin | Published: July 07, 2015 1:16 AM

सेरेना विलियम्स, मारिया शारापोव्हा, अ‍ॅन्डी मरे, स्टेन वावरिंका आपआपल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून सोमवारी विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.

लंडन : नंबर वन टेनिसपटू आणि अव्वल मानांकनप्राप्त अमेरिकेची सेरेना विलियम्स, चौथी मानांकित रशियाची मारिया शारापोव्हा, अ‍ॅन्डी मरे, स्टेन वावरिंका तर पुरूष दुहेरीत रोहन बोप्पणा व त्याचा जोडीदार फ्लोरिन मर्जिया यांनी आपआपल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून सोमवारी विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.सेरेनाने मोठी बहीण व्हिनसचा ६७ मिनिटांच्या खेळात ६-४, ६-३ ने सलग सेट्समध्ये पराभव केला. माजी विजेती शारापोव्हा हिने कझाकिस्तानची युवा खेळाडू झरिना डियास हिच्यावर १ तास ३६ मिनिटांत ६-४, ६-४ ने विजय साजरा केला. जेतेपदाची प्रबळ दावेदार मानली जाणारी पाच वेळेची चॅम्पियन सेरेनाने चौथ्या फेरीत मोठी बहीण व्हिनसला नमविले. पुरुष गटाच्या चौथ्या फेरीच्या सामन्यात एक अपसेट घडला. बिगर मानांकित खेळाडू कॅनडाचा वासेक पोप्सिसिल याने २२ वा मानांकित सर्बियाचा व्हिक्टर ट्रायकी याच्यावर २ तास ३९ मि. चाललेल्या संघर्षात पाच सेट्समध्ये ४-६, ६-७, ६-४, ६-३, ६-३ ने सरशी साधली. दुसऱ्या एका लढतीत ब्रिटनच्या अँन्डी मरेने सुमारे ३ तास ०३ मि. चाललेल्या लढतीत क्रोएशियाच्या २३ वा मानांकित इवो कार्लोविचला ७-६(९-७), ६-४, ५-७, ६-४ असा पराभव केला. फ्रान्सचा रिचर्ड गास्के याने २६ वर्षांचा युवा आॅस्ट्रेलियन निक किर्गियोस याच्यावर २ तास ५३ मि. चार सेटमध्ये ७-५, ६-१, ६-७, ७-६ ने संघर्षपूर्ण विजयाची नोंद केली. महिला एकेरीत पोलंडच्या अग्निस्जका रांदवांस्का ने सर्बियाच्या येलेना यांकोविच ला ७-५, ७-६ असे नमविले. (वृत्तसंस्था)दुहेरीत बोपन्ना क्वार्टर फायनलमध्ये; पेस स्पर्धेबाहेर>रोहन बोपन्ना याने विपरीत परिस्थितीत विजय मिळवून विम्बल्डन टेनिस स्पर्धेत सोमवारी उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. पण, लिएंडर पेस हा पाच सेटमधील संघर्षात पराभूत होऊन स्पर्धेबाहेर पडला. > बोपन्नाने रुमानियाचा फ्लोरिन मर्जियाच्या सोबतीने पोलंडचा लुकास कुबोट व बेलारुसचा मॅक्स मिर्नयी यांचा ३ तास १९ मिनिटांत ७-६, ६-७, ७-६, ७-६ नी पराभव केला.> लिएंडर पेस आणि कॅनडाचा डॅनियल नेस्टर या जोडीला तिसऱ्या फेरीत आॅस्ट्रियाचा अलेक्झांडर पेया व ब्राझीलचा बूनो सोरेस यांच्याकडून ३-६, ५-७, ६-३, ६-२, २-६ नी पराभवाचा धक्का बसला. सानिया-हिंगीस उपांत्यपूर्व फेरीत> अव्वल मानांकित भारताची सानिया मिर्झा व स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस यांनी सोमवारी शानदार विजय मिळवताना विम्बल्डन टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.> अव्वल मानांकित सानिया-हिंगीस जोडीने स्पेनच्या एनाबेल मेदिना गॅरिग्स व अरांशा पॅरा सांतोजा या १६ व्या मानांकित जोडीचा ६-४, ६-३ ने पराभव केला. विजेत्या जोडीने या लढतीत आठपैकी पाच ब्रेकपॉइंटवर गुण वसूल केले आणि चार विनर्स लगावले. > स्पेनच्या जोडीने सहापैकी तीन ब्रेक पॉइंट वसूल केले. सानिया-हिंगीस जोडीने निर्णायक क्षणी कामगिरीचा दर्जा उंचावत उपांत्यपूर्व फेरीत स्थान निश्चित केले.