मुंबई : जानेवारीच्या अखेरीस नाशिक येथे होणा-या १२व्या वरिष्ठ राज्यस्तरीय बेसबॉल स्पर्धेसाठी मुंबई उपनगर संघाची १४ जानेवारीला निवड होणार आहे. मुंबई उपनगर संघ निवड चाचणी मुंबई शहर, उपनगर, ठाणे आणि नवी मुंबईतील खेळाडूंसाठी खुली असेल, अशी माहिती आयोजकांनी दिली.मुंबई उपनगर जिल्हा बेसबॉल संघटनेच्या वतीने होत असलेल्या या निवड चाचणीसाठी खेळाडूंना स्वत:चे साहित्य सोबत आणण्याची सूचना करण्यात आली आहे. बोरीवली पश्चिमेकडील एम. एच. बी. कॉलनी येथील जनरल अरुणकुमार वैद्य मैदानात ही निवड चाचणी प्रक्रीया पार पडणार असून यामध्ये सहभागी होण्यास इच्छूक असलेल्या खेळाडूंनी सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत संघटनेचे सचिव राजेंद्र ईखणकर व सहसचिव लिना म्हात्रे यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यस्तरीय बेसबॉल स्पर्धेसाठी बोरीवलीमध्ये निवड चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 00:08 IST