शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

दुय्यम प्रशिक्षक सर्वोत्तम खेळाडू घडवणार नाहीत, पी. गोपीचंद यांचे स्पष्ट मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 08:48 IST

Badminton News: दुसऱ्या श्रेणीचे विदेशी प्रशिक्षक केवळ दुसऱ्या श्रेणीचेच खेळाडू घडवतील’, असे मत भारताचे बॅडमिंटन प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांनी व्यक्त केले.

नवी दिल्ली : ‘विदेशी आणि भारतीय प्रशिक्षकांचे चांगले मिश्रण देशातील क्रीडा व्यवस्थेच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण आहे. मात्र, प्रशिक्षकांचा दर्जा उच्च असला पाहिजे. कारण, दुसऱ्या श्रेणीचे विदेशी प्रशिक्षक केवळ दुसऱ्या श्रेणीचेच खेळाडू घडवतील’, असे मत भारताचे बॅडमिंटन प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांनी व्यक्त केले.गोपीचंद यांनी गुरुवारी प्रशिक्षक शिक्षण कार्यक्रमाचे ऑनलाइन उद्घाटन केले. या वेळी त्यांनी प्रशिक्षकांचे महत्त्व पटवून दिले. ते म्हणाले, ‘विदेशी प्रशिक्षक खेळाडू आणि खेळाच्या विकासासाठी महत्त्वाचे आहेत. विदेशी प्रशिक्षकांचे चांगले मिश्रण असणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. जेव्हा खेळामध्ये आपल्याकडे प्रावीण्य नसते, तेव्हा सुरुवातीला पूर्णकालीन विदेशी साहाय्यक संघात ठेवणे चांगले ठरते. मात्र, आपण त्यांना कायम ठेवले, तर आपण आपल्या व्यवस्थेला न्याय देऊ शकणार नाही.’गोपीचंद पुढे म्हणाले, ‘अशा प्रशिक्षकांकडून आपण शिकायला पाहिजे. पण, हे दुसऱ्या श्रेणीचे प्रशिक्षक केवळ दुसऱ्या श्रेणीचेच खेळाडू घडवतील, सर्वोत्तम खेळाडू नाही.’आपल्याला कधीही सर्वोत्तम विदेशी प्रशिक्षकाची सेवा मिळालेली नाही. आपल्याला नेहमी दुसरा सर्वोत्तम प्रशिक्षकच मिळणार. भारतीय प्रशिक्षक कायम भारताच्या विजयासाठीच प्रयत्न करणार, तर विदेशी प्रशिक्षक केवळ आपला करार कायम राखण्यासाठी प्रयत्न करणार. त्यामुळे ज्या खेळांमध्ये आपण सातत्याने चांगली कामगिरी करीत आहोत, अशा खेळांमध्ये खेळाडूंना प्रशिक्षक म्हणून घडविण्यात आले पाहिजे.- पी. गोपीचंद

टॅग्स :BadmintonBadminton