शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

दुसरी कसोटी रंगतदार अवस्थेेत

By admin | Updated: March 6, 2017 17:30 IST

चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी पाचव्या विकेटसाठी केलेल्या नाबाद 92 धावांच्या भागिदारीमुळे यजमान भारतीय संघाने दुसऱ्या कोसोटीत 126 धावांची आघाडी घेतली आहे

ऑनलाइन लोकमतबंगळुरू, दि. 6 - आघाडीची फळी अपयशी ठरल्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी पाचव्या विकेटसाठी केलेल्या नाबाद 92 धावांच्या भागिदारीमुळे यजमान भारतीय संघाने दुसऱ्या कोसोटीत 126 धावांची आघाडी घेतली आहे. पुणे कसोटीत 333 धावांनी पराभव स्वीकारणारा भारतीय संघाचा पहिला डाव 189 धावांत संपुष्टात आल्यानंतर पाहुण्या ऑस्ट्रेलिया संघाने 276 धावा करत 87 धावांची आघाडी घेतली होती. तिसऱ्या दिवसाखेर दुसऱ्या डावात भारताने चार बाद 213 धावा केल्या आहेत. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी चेतेश्वर पुजारा 79, तर अजिंक्य रहाणे 40 धावांवर खेळत आहेत. कर्णधार विराट कोहली पुन्हा अपयशी ठरला. वैयक्तिक 15 धावसंखेवर हेजलवूडने पायचित केले. पहिल्या डावात अर्धशतक करत भारताच्या धावसंखेला आकार देणाऱ्या राहुलने दुसऱ्या डावातही अर्धशतक झळकावले. राहुलने 85 चेंडूत 51 धावांची खेळी केली , यामध्ये चार चौकारांचा समावेश आहे. जडेजा (2), मुकुंद(16) धावांवर बाद झाले. पाहुण्या संघाकडून हेजलवूडने सर्वाधिक तीन फलंदाजांना बाद केले. 

दरम्यान, दुस-या कसोटीच्या तिसऱ्या दिवशीच्या सुरुवातीलाच भारताला ऑस्ट्रेलियाचा डाव 276 धावांमध्ये रोखण्यात यश आलं. फिरकीपटू रविद्र जडेजाच्या भेदक मा-याच्या जोरावर भारताने कांगारूंचा डाव संपुष्टात आणला. जडेजाने 63 धावा देऊन 6 विकेट्स घेतल्या. अश्विनने दोन तर शर्मा आणि यादव यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. कालच्या 6 बाद 237 धावांहून पुढे खेळताना कांगारूंनी सुरूवातीला सावध पवित्रा घेतली. काल नाबाद असलेले स्टार्क आणि वेड यांनी आघाडी 50 धावांच्या पुढे नेली. संघाच्या 269 धावा असताना अश्विनने स्टार्कला (26) बाद करत ही जोडी फोडली आणि पुढच्या अवघ्या 8 धावांमध्ये कांगारूंचा डाव जडेजाने संपुष्टात आणला. त्यापुर्वी काल सलामीवीर मॅट रेनशॉ व शॉन मार्श यांची झुंजार अर्धशतकी खेळी, भारताचे सुमार क्षेत्ररक्षण आणि डीआरएसच्या चुकीचा लाभ घेत ऑस्ट्रेलियाने रविवारी पहिल्या डावात आघाडी घेतली आणि दुसऱ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसअखेर वर्चस्व कायम राखले होते. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवसअखेर 6 बाद 237 धावांची मजल मारली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 48 धावांची आघाडी घेतली होती.