शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

संजिता चानूचा ‘ब’ नमुना पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2018 00:01 IST

डोपिंगचा डाग पुसून काढण्यासाठी धडपडणारी भारोत्तोलक संजिता चानू हिच्या अडचणीत आणखी भर

नवी दिल्ली : डोपिंगचा डाग पुसून काढण्यासाठी धडपडणारी भारोत्तोलक संजिता चानू हिच्या अडचणीत गुरुवारी आणखी भर पडली. तिच्या डोप चाचणीचा ‘ब’ नमुना पॉझिटिव्ह आढळल्याने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची सुवर्ण विजेती संजिता आता आंतरराष्ट्रीय भारोत्तोलन महासंघाच्या सुनावणी लवादाकडे दाद मागणार आहे. लवादापुढे आपली बाजू मांडण्यास असमर्थ ठरल्यास संजिताला किमान चार वर्षे बंदीचा सामना करावा लागेल.संजिताचा भाऊ बिजेनसिंग म्हणाला,‘ब चाचणीचा अहवाल संजिताला ११ सप्टेंबरला मिळाला. आता बुडापेस्ट येथे लवादापुढे बाजू मांडू. आम्हाला विजयाचा विश्वास आहे. येथे अपयश आल्यास स्वित्झर्लंडस्थित क्रीडा लवादाकडे धाव घेऊ.’ लवादापुढे उभे राहायचे की नाही हे कळविण्यासाठी संजिताला १८ सप्टेंबरपर्यंतची वेळ देण्यात आली आहे.संजिताच्या डोपिंगचा अ नमुना विश्व चॅम्पियनशिपआधी १८ नोव्हेंबरला अमेरिकेतील स्पर्धेनंतर घेण्यात आला होता. १५ मे रोजी निकाल आला तेव्हा अ‍ॅनाबोलिक स्टेराईड आढळल्याचे सांगून अस्थायीरीत्या तिला निलंबित करण्यात आले. ब नमुन्याचा तपास करण्याचा जूनमध्ये आग्रह धरण्यात आला. याचा निकाल ११ सप्टेंबर रोजी आला.दरम्यान विश्व भारोत्तोलन संघटनेने संजिताला पाठविलेल्या निकालपत्रात दुसऱ्याच एका खेळाडूच्या नमुन्याचा क्रमांक पाठविला होता. याबाबत आमची चूक झाल्याचे मान्य देखील केले होते. संजिताने त्या क्रमांकाच्या खेळाडूच्या नावाचा खुलासा करण्याची विनंतीदेखील केली आहे.मी स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्यासाठी आंतरराष्टÑीय महासंघाच्या सुनावणी लवादाकडे आपल्या प्रतिनिधीमार्फत दाद मागणार आहे.- संजिता चानू