शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

दगडाला शिल्प बनवणारे संजय चव्हाण सर

By प्रसाद लाड | Updated: February 18, 2019 18:50 IST

मुंबई श्री स्पर्धा जिंकल्यावर बिलावाने आपले प्रशिक्षक संजय चव्हाण सर यांना मंचावर बोलावलं आणि आनंद साजरा केला.

ठळक मुद्देबिलावा आंतरराष्ट्रीय किर्तीचा शरीरसौष्ठव होईल​​​​​​​...

मुंबई : दगडाला आकार दिल्याशिवाय त्याला मुर्तीचे रुप प्राप्त होत नाही. त्यासाठी त्या मुर्तीबरोबरच दगडाला आकार देणारे हातही महत्वाचे असतात. अनिल बिलावाने नवोदित श्री या स्पर्धेनंतर मुंबई श्रीमध्ये बाजी मारत इतिहास रचला. मुंबई श्री स्पर्धा जिंकल्यावर बिलावाने आपले प्रशिक्षक संजय चव्हाण सर यांना मंचावर बोलावलं आणि आनंद साजरा केला. आपल्यासारख्या ओबडधोबड दगडाला शिल्प बनवणाऱ्या चव्हाण सरांना बिलावा विजयानंतर विसरला नाही, हे साऱ्यांनी पाहिलं. बिलावाच्या ऐतिहासिक यशाबद्दल आम्ही त्याचे प्रशिक्षक संजय सर यांच्याशी खास बातचीत केली. यावेळी बिलावाचा आतापर्यंतचा प्रवास संजय सरांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केला.

संजय सर बिलावाबद्दल म्हणाले की, "फक्त मजा-मस्ती करण्यासाठी बिलावा शरीर संपादन करत होता. त्याचं पोट पुढे होतं. त्याच्या मित्रांनी त्याला शरीरसौष्ठव होण्यासाठी प्रोत्साहित केलं. त्यानंतर त्याने गंभीरपणे यावर विचार केला. त्यानंतर त्याला एका व्यक्तीने सांगितलं की, तुला खरंच शरीरसौष्ठव क्षेत्रात नाव कमावायचं आहे, तर तुला संजय चव्हाण यांच्याकडे जायला हवं. त्याने मला फेसबूकवर विनंती पाठवली होती. पण मी जास्त फेसबूक पाहत नाही. त्यानंतर त्याने माझ्या विद्यार्थाकडून मोबाईल नंबर मिळवला आणि मला फोन केला. मला सांगितलं की, मला तुम्हाला भेटायचं आहे. त्यानंतर 24 ऑगस्टला तो मला भेटायला आला. तेव्हा त्याला पाहिलं तेव्हा शरीरसौष्ठवासाठी लागेल अशी त्याची शरीरसंपदा नव्हती. पण त्याची मसल्स मॅच्युरिटी फार चांगली होती." 

बिलावा आंतरराष्ट्रीय किर्तीचा शरीरसौष्ठव होईल...तुला नक्की काय करायचंय, असं मी बिलावाला विचारलं, त्यावर तो म्हणाला की, मला नवोदित मुंबई श्री स्पर्धा खेळायची आहे. पण नवोदितच्या कोणत्याही खाणाखूणा त्याच्या मसल्समध्ये दिसत नव्हत्या. कारण त्याचं 36 वय होतं. पण जन्माला आलाय शरीरसौष्ठवासाठीच, हे मला त्याची शरीरसंपदा पाहून समजलं. योगायोगाने तो माझ्याकडे आला आणि सारं काही स्वप्नवत झालं. एक इतिहास रचला गेला. बिलावाची मेहनत आणि आर्थिक गणिताची जुळवाजुळव यशस्वी झाली तर ही खेळाडू महाराष्ट्र श्रीमध्येही चमत्कार घडवू शकतो. येणाऱ्या एक-दोन वर्षात बिलावा आंतरराष्ट्रीय किर्तीचा शरीरसौष्ठव होईल, असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 

टॅग्स :bodybuildingशरीरसौष्ठवMumbaiमुंबई