शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
2
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
3
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
4
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
5
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
7
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
8
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
9
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
10
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
11
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
12
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
13
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
14
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
15
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
16
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
17
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
18
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
19
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
20
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश

सानिया मिर्झाने ‘जोको’ला टाकले मागे

By admin | Updated: November 3, 2015 03:58 IST

विश्व टेनिस क्रमवारीतील दुहेरीची अव्वल टेनिसपटू सानिया मिर्झा हिने २०१५ मध्ये जेतेपदाबाबत पुरुष क्रमवारीतील नंबर वन खेळाडू सर्बियाचा नोवाक जोकोविच याला मागे टाकले आहे.

नवी दिल्ली : विश्व टेनिस क्रमवारीतील दुहेरीची अव्वल टेनिसपटू सानिया मिर्झा हिने २०१५ मध्ये जेतेपदाबाबत पुरुष क्रमवारीतील नंबर वन खेळाडू सर्बियाचा नोवाक जोकोविच याला मागे टाकले आहे.सानियाने जोडीदार स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीससोबत रविवारी सिंगापूरमध्ये वर्षातील अखेरची डब्ल्यूटीए फायनल जिंकली. या जेतेपदानंतर तिने जोकोविचला मागे टाकले. सानियाचे हिंगीससोबत वर्षभरात नववे आणि वैयक्तिक जेतेपद होते. शिवाय डब्ल्यूटीए विजेतेपदही कायम राखले आहे. गतवर्षी तिने झिम्बाब्वेची कारा ब्लॅक हिच्यासोबत ही स्पर्धा जिंकली होती. जोकोविच एका वर्षांत नऊ जेतेपदाचा मानकरी ठरला होता. जोकोविचला अद्यापही सानियाला मागे टाकण्याची संधी आहे. तो पॅरिस मास्टर्स आणि लंडनमधील एटीपी वर्ल्ड टूर फायनल्स जिंकून पुढे जाऊ शकतो. सानियाने यंदा मार्च महिन्यात इंडियन वेल्समध्ये हिंगीससोबत पहिले जेतेपद पटकविले होते.सानिया-हिंगीस जोडी गेल्या २२ सामन्यांत अपराजित राहिली. या काळात केवळ दोनच सेट गमावले. (वृत्तसंस्था) सानिया-हिंगीस वर्षाचा शेवट नंबर एक जोडी म्हणून करणार असून, जोकोविचदेखील वर्षांची अखेर अव्वल नंबर खेळाडू म्हणूनच करेल. सानियाचे दुहेरीत ११३५५ गुण आहेत. सेरेनाचे ९९४५ आणि जोकोविचचे १५७८५ गुण आहेत. रँकिंग गुणांवर नजर टाकल्यास जागतिक टेनिसमध्ये सानियाच्या पुढे केवळ जोकविच आहे.दोघी रोम ओपनमध्ये उपविजेत्या होत्या. सानियाने एकीकडे वर्षांतील दहावे तर हिंगीसने ५० वे डब्ल्यूटीए जेतेपद मिळविले. ही कामगिरी करणारी जगातील ती १६ वी खेळाडू आहे. सानियाला यंदा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. जोकोविचने आतापर्यंत तीन ग्रॅण्डस्लॅमसह नऊ जेतेपद पटकविली आहेत. त्यात आॅस्ट्रेलियन ओपन, विम्बल्डन आणि अमेरिकन ओपनशिवाय इंडियन वेल्स, मियामी, माँटे कार्लो आणि रोम एटीपी मास्टर्स १००० चा देखील समावेश आहे. चायना ओपन आणि शांघाय मास्टर्स या दोन स्पर्धेतही जोकोविचने चमक दाखविली.