शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सानिया मिर्झाची उपांत्य फेरीत धडक; पुरुष एकेरीत जोकोविच पाच सेटपर्यंत झुंजला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 09:12 IST

सहाव्या मानांकित सानिया-मेट यांनी १ तास ४१ मिनिटे रंगलेल्या रोमांचक सामन्यात दाब्रोवस्की-पीयर्स यांचा ६-४, ३-६, ७-५ असा पराभव केला

लंडन : अत्यंत चुरशीच्या सामन्यात भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा हिने क्रोएशियाच्या मेट पॅविकसोबत खेळताना विम्बल्डनच्या मिश्र दुहेरीची उपांत्य फेरी गाठली. तीन सेटपर्यंत रंगलेल्या सामन्यात सानिया-मेट यांनी गॅब्रिएला दाब्रोवस्की (कॅनडा) - जॉन पीयर्स (ऑस्ट्रेलिया) यांचा २-१ असा पराभव केला. दुसरीकडे पुरुष एकेरीत दिग्गज नोव्हाक जोकोविचने झुंजार खेळ करताना उपांत्य फेरी गाठली.

सहाव्या मानांकित सानिया-मेट यांनी १ तास ४१ मिनिटे रंगलेल्या रोमांचक सामन्यात दाब्रोवस्की-पीयर्स यांचा ६-४, ३-६, ७-५ असा पराभव केला. सानियाने अप्रतिम फटके मारताना मोलाचे योगदान दिले. मेट याने आपल्या वेगवान सर्व्हिसच्या जोरावर महत्त्वपूर्ण गुण मिळवले. दाब्रोवस्की-पीयर्स या चौथ्या मानांकित जोडीने दुसऱ्या सेटमध्ये पुनरागमन करताना सामना बरोबरीत आणला. मात्र, तिसऱ्या सेटमध्ये सानिया-मेट यांनी रॅलीज् खेळून दाब्रोवस्की-पीयर्स यांना चुका करण्यास भाग पाडले.  

अव्वल मानांकीत जोकोविचला उपांत्य फेरी गाठण्यासाठी पाच सेटपर्यंत झुंजावे लागले. इटलीच्या जेनिक सिन्नरने पहिले दोन सेट जिंकत शानदार आघाडी घेतली. परंतु, जोकोने नंतर सलग तीन सेट जिंकताना ५-७,२-६, ६-३, ६-२, ६-२ असा झुंजार विजय मिळवला.

राफाचा धडाका!स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदाल याने आपला धडाका कायम राखताना सरळ तीन सेटमध्ये बाजी मारत दिमाखात उपांत्यपूर्व फेरी गाठली. एकतर्फी झालेल्या सामन्यात नदालने नेदरलँड्सच्या बॉटिक वॅन डी झँडशुल्प याचा ६-४, ६-२, ७-६ (८-६) असा धुव्वा उडवला. तिसरा सेट टायब्रेकमध्ये नेत बॉटिकने थोडीफार झुंज दिली, पण अनुभवी नदालपुढे त्याची डाळ शिजली नाही. अन्य सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गियोसला उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्यासाठी पाच सेटपर्यंत झुंजावे लागले. अमेरिकेच्या ब्रँडन नकाशिमा याचे कडवे आव्हान ४-६, ६-४, ७-६ (७-२), ३-६, ६-२ असे परतावत किर्गियोसने विजयी आगेकूच केली.

टॅग्स :Sania Mirzaसानिया मिर्झा