हैदराबाद : भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक या दाम्पत्याला 30 ऑक्टोबरला पुत्रप्राप्ती झाली. दोघांनी त्याचे नाव इझान मिर्झा मलिक असे ठेवले. शुक्रवारी सानियाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आणि लहानग्या इझानसह सानिया घरी परतली. प्रसुती काळात सोशल मीडियापासून दूर गेलेली सानिया ट्विटरवर पुन्हा अॅक्टिव्ह झाली आहे. तिने इझानचा फोटो पोस्ट करून ट्विटरवर कमबॅक केले. पण, या फोटोत एक गम्मत दडली आहे.
सानिया मिर्झा ट्विटरवर पुन्हा अॅक्टिव्ह; बघतोस ना बाळा, बाबा बॅटिंग करतोय...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2018 15:25 IST