उपांत्यपूर्व फेरीत सानिया पराभूत

By Admin | Updated: September 7, 2016 02:01 IST2016-09-07T02:01:18+5:302016-09-07T02:01:18+5:30

सानिया मिर्झा आणि तिची नवी साथीदार चेक प्रजासत्ताकची बारबारा स्ट्राइकोव्हा यांना अमेरिकन ओपनच्या उपांत्य पूर्व लढतीत फ्रान्सच्या जोडीने सरळ सेटमध्ये पराभूत केले.

Sania defeats in quarter-finals | उपांत्यपूर्व फेरीत सानिया पराभूत

उपांत्यपूर्व फेरीत सानिया पराभूत

न्युयॉर्क : सानिया मिर्झा आणि तिची नवी साथीदार चेक प्रजासत्ताकची बारबारा स्ट्राइकोव्हा यांना अमेरिकन ओपनच्या उपांत्य पूर्व लढतीत फ्रान्सची कॅरोलिन ग्रेसिया आणि क्रिस्टिना म्लाडोनविक या जोडीने सरळ सेटमध्ये पराभूत केले. यासोबतच सानियाचे अमेरिकन ओपनमधील आव्हान संपुष्टात आले आहे.
६९ मिनिटे चाललेल्या या सामन्यात ग्रेसिया-म्लाडोनविक जोडीने सानिया आणि बाराबाराला ७(७)-६(३), ६ -१ असे पराभूत केले. पहिल्या सेटमध्ये सानिया आणि बाराबोरा यांनी चांगली लढत दिली होती.

Web Title: Sania defeats in quarter-finals