शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कबड्डी : संघर्ष स्पोर्ट्स तिसऱ्या फेरीत दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 22:03 IST

संघर्ष स्पोर्ट्स क्लबने प्रबोधन स्पोर्ट्स क्लबचा ३२-११ असा पाडाव करीत तिसरी फेरी गाठली.

मुंबई उपनगर कबड्डी असो. च्या विद्यमाने आयोजित केलेल्या “जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या” कुमारी गटात संघर्ष स्पोर्ट्स क्लब, राजमुद्रा क्रीडा मंडळ यांनी तिसरी फेरी गाठली.  नेहरू नगर-कुर्ला येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर सुरू असलेल्या कुमारी गटात संघर्ष स्पोर्ट्स क्लबने प्रबोधन स्पोर्ट्स क्लबचा ३२-११ असा पाडाव करीत तिसरी फेरी गाठली. कोमल यादव, पूजा विनेरकर यांनी सुरवातीपासून चढाई-पकडीचा आक्रमक खेळ करीत मध्यांतराला १५-०५ अशी आघाडी घेत विजयाचा पाया रचला होता. मध्यांतारानंतर आक्रमणाची धार आणखी वाढवीत विजय निश्चित केला. प्रबोधन स्पोर्ट्स कडून रोशनी मसुरकर एकाकी लढली. दुसऱ्या सामन्यात राजमुद्रा क्रीडा मंडळाने आकाश स्पोर्ट्स क्लबला २३-२२ असे चकवित आगेकूच केली. मध्यांतराला दोन्ही संघ १५-१५ असे बरोबरीत होते. मध्यंतरानंतर राजमुद्राच्या ललिता जाधव, संचिता सोनावणे यांनी शांत आणि संयमी खेळ करीत १ गुणांनी संघाचा विजय साकारला. आकाशकडून तनिशा भद्रीके, आदिती शिगवण यांनी शेवटपर्यंत शर्थीची लढत दिली. पण संघाला विजयी करण्यात त्यांना अपयश आले.

  कुमार गटाच्या पहिल्या फेरीत श्री सिद्धिविनायक मंडळाने साईधाम सेवा मंडळाचा ४१-१७असा धुव्वा उडविला. विजयी संघाने मध्यांतारालाच २९-०७ अशी भक्कम आघाडी घेतली होती. ओमकार मोटे, रोशन पवार या विजयाचे शिल्पकार ठरले. साईधामचा नवनाथ सणगर चमकला. सत्यम सेवा मंडळाने पार्ले स्पोर्ट्सचा ४०-१३ असा पाडाव केला. यश डांगे, ऋषी यादव सत्यम कडून उत्कृष्ट खेळले. पार्लेचा निखिल पिसाळ चमकला. याच गटात शिंब्रादेवी सेवा मंडळाने चुरशीच्या लढतीत प्रबोधन स्पोर्ट्स क्लबचा २०-१४असा पराभव करीत आगेकच केली. मध्यांतराला ६-८अशा पिछाडीवर पडलेल्या शिंब्रादेवीच्या मनीष लाड, ओमकार लाड यांनी उत्तरार्धात जोशपूर्ण खेळ करीत संघाला विजय मिळवून दिला. प्रबोधनाच्या पवन पाटील, तेजस कदम यांच्या पूर्वार्धातील जोश उत्तरार्धात कमी पडला.

  व्दितीय श्रेणी ( ब) गटात संघर्ष क्रीडा मंडळाने निर्धास्त मंडळावर १९-१२ अशी मात केली. अभिषेक बिराजदार, बॉबी केवट या विजयाचे शिल्पकार ठरले. संजय व आयुष या चव्हाण पिता-पुत्राचा खेळ निर्धास्त मंडळाचा पराभव टाळण्यास कमी पडला.  आयुष हा गतवर्षी उपनगरच्या कुमार गटाच्या संघात होता. सन्मित्र मंडळाने उत्कर्ष मंडळाचा कडवा प्रतिकार १८-१६ असा मोडून काढला. मध्यांतराला दोन्ही संघ ८-८ असे समान गुणांवर होते. केतन सुतार, शेखर महामुलकर सन्मित्र कडून, तर साईराज कदम, स्वप्नील पाटील उत्कर्ष कडून उत्कृष्ट खेळले. लोकमान्य शिक्षण संस्थेने अझीझ शिक्षण संस्थेचा २७-१२ असा, गावदेवीने यंग साईचा २७-०६ असा ,तर स्वामी स्वामी समर्थने सक्षम मंडळाचा २९-०५असा पराभव करीत दुसरी फेरी गाठली.

छायाचित्र पुरुष :- निर्धास्त मंडळाच्या संजय कदमने संघर्ष मंडळाच्या खेळाडूची केलेली यशस्वीते पकड.

टॅग्स :Kabaddiकबड्डीMumbaiमुंबई