शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

साना शेट्टी आणि हर्ष पाचौरी सर्वोत्तम; गोकुळधामला सांघिक विजेतेपद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 17:45 IST

प्रबोधन आंतर-शालेय क्रीडा महोत्सव

मुंबई, १० डिसेंबर : उंच उडी प्रकारात नवीन स्पर्धा विक्रमासह सुवर्ण आणि लांब उडीमध्ये रौप्य पदक पटकावणारी साना शेट्टी (विसनजी अकादमी) आणि रायन इंटरन्याशनल – मालाडचा हर्ष पाचौरी हे ४१ व्या प्रबोधन आंतर-शालेय क्रीडा महोत्सवातील एथलेटीक्स प्रकारात सर्वोत्तम ठरले. सानाने उंच उडी प्रकारात १.४८ मीटर्स अंतर पार केले तर त्यानंतर लांब उडी प्रकारात ४.५९ मीटर्सची झेप घेतली . हर्ष पाचौरी याने मुलांच्या १४ वर्षाखालील वयोगटात ६०० मीटर्स धावण्याच्या शर्यतीत सुवर्ण पदक विजेती कामगिरी केली. या दोघांची एकूण कामगिरी विचारात घेत आय.ए.ए.एफ. च्या नॉर्मनुसार गुण बहाल करीत त्यांना सर्वोत्तम एथलीट म्हणून घोषित करण्यात आले. गोकुळधाम हायस्कूल यांनी सर्वाधिक ९८ गुणांसह सांघिक विजेतेपदाचा मान मिळविला तर लक्षधाम हायस्कूल-गोरेगाव यांना ७८गुणांसह उपविजेते पदावर समाधान मानावे लागले.

एथलेटीक्स स्पर्धेत तीन सुवर्ण पदके पटकावण्याचा मान श्रीहर्षिता बोबिली (लोखंडवाला-कांदिवली) हिने मिळविला. तिने १०० मीटर्स धावण्याच्या शर्यतीत १३.४ सेकंद, २०० मीटर्स मध्ये २८.७ सेकंद आणि ४०० मीटर्स मध्ये ६७.९ अशी वेळ नोंदवत १६ वर्षाखालील मुलींच्या गटात तीन सुवर्ण पदकांचा मान मिळविला. मुलींमध्ये सहा जणींनी दुहेरी सुवर्ण पद्कांचा मान मिळविला. हर्षिता शेट्टी (लोखंडवाला – कांदिवली) हिने गोळाफेक प्रकारात १२.३२ मी. आणि थाळीफेक प्रकारात ३२.९० मी. अशी फेक करीत १६ वर्षाखालील मुलींच्या गटात नवीन स्पर्धा विक्रमाची नोंदही केली. 

साक्षी वाफेलकर (महात्मा गांधी विद्यामंदिर) या आणखी एका एथलीटने याच वयोगटात दुहेरी सुवर्ण पदकांचा मान मिळविताना ८०० मीटर्स (२ मी. ४६.८ सेकंद) आणि २०० मीटर्स शर्यतीत ८ मी. ०३.८ सेकंद अशी वेळ नोंदवत अन्य स्पर्धकाना मागे टाकले. किआ पिसाट (गोकुळधाम) हिने १०० मीटर्स (१३.३ सेकंद ) आणि २०० मीटर्स मध्ये २८.३ सेकंदासह स्पर्धा विक्रमाची बरोबरीही केली.

 

प्रीस्टल डिसूझा हिने गोळा फेक (९.६९ मी.) आणि थाळीफेक (२५.०७ मी.) अशी कामगिरी करून १४ वर्षाखालील गटात दोन सुवर्ण पदके मिळविली तर लक्षधामच्या जोशीका राणी हिने ८ वर्षाखालील वयोगटात ५० मीटर्स (८.६) आणि १०० मीटर्स (१७.४) शर्यतीत विजेतेपद पटकावले. चिल्ड्रन्स अकादमीच्या दिव्यम शाह याने भालाफेक प्रकारात (३६ मी.)आणि लांब उडीत (५.७९ मी.) अव्वल कामगिरी केली तर गगन अमीन (राधाकृष्णन) यानेही १६ वर्षाखालील गटात ८०० मीटर्स (२ मी. २३.७ सेकंद) आणि २००० मीटर्स धावण्याच्या शर्यतीत (७ मी. ०९.४ सेकंद) सर्वोत्तम कामगिरी करून दुहेरी सुवर्ण पदके मिळविली. हर्ष ठाकूर (गोकुळधाम) याने १४ वर्षाखालील वयोगटात १०० मीटर्स (१२.५ सेकंद) आणि २०० मीटर्समध्ये (२६.३ सेकंद) विजयी कामगिरी केली, दर्शन ठाकरे (गोकुळधाम) याने १० वर्षाखालील मुलांच्या गटात ५० मीटर्स (७.६ सेकंद ), १०० मीटर्स मध्ये १४.८ सेकंद आणि लांब उडीत ३.८२ मी.) अशी कामगिरी केली तर शोन मेंडोंसा याने ८ वर्षाखालील मुलांच्या गटात ५० मीटर्स (८.३ सेकंद ) आणि १०० मीटर्स धावण्याच्या शर्यतीत (१६ सेकंद ) नवीन स्पर्धा विक्रमासह सुवर्ण पदक अशी कामगिरी केली.

टॅग्स :Mumbaiमुंबई