शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
2
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
3
ना आई ऐकत होती, ना पत्नी; सततच्या वादाला कंटाळलेल्या तरुणाने स्वतःलाच संपवले!  
4
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
5
रिषभ पंतच्या 'डबल' सेंच्युरीसंदर्भातील प्रश्न कोच गंभीरला खटकला; म्हणाला...
6
काय राव! आठ महिन्यांपूर्वी सबस्क्रीप्शनवर मोफत टीव्ही आणला; आता कंपनीच पळून गेली ना...
7
'जिओ माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धोका होता'; अंबानींनी का घेतली अब्जावधींची रिस्क? वाचा Inside Story!
8
'तुमच्या मदतीची गरज नाही...', पुतिन यांनी काय ऑफर दिली? डोनाल्ड ट्रम्प यांचा स्पष्ट नकार
9
ब्रेझाचे इंजिन, नवे नवे नाव...! स्पेसिअस केबिनची नवी मारुती SUV कार येतेय...
10
Jalgaon Teacher Suicide: खळबळजनक! जळगाव येथील एका शिक्षकाची शाळेच्या वर्गातच आत्महत्या
11
CSK स्टार मुरली विजयी दिग्गज क्रिकेटपटूच्या लेकीला करतोय डेट? Viral Photo मुळे चर्चांना उधाण
12
Kalidas Din 2025: करंगळीच्या बाजूच्या बोटाला 'अनामिका' नाव मिळण्यामागे आहे कालिदासांचा संदर्भ!
13
पाकिस्तान तयार करतंय अमेरिकेपर्यंत मारा करणारं अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट  
14
ब्रिटिश नेव्हीचे फायटर जेट अजूनही केरळमध्येच! घरवापसीसाठी का लागतोय इतका वेळ?
15
China Rare Earth Magnet: चीननं ठेंगा दाखवल्यानंतर सरकारला आली जाग; आता देशातच होणार रेअर अर्थ मॅग्नेटचं उत्पादन
16
स्लिपमध्ये अनुभवाची कमी! ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे टीम इंडियावर आली लाजिरवाणी वेळ
17
Viral News: काहीही न सांगता कर्मचाऱ्याने सोडला जॉब; एचआर झाली नाराज, लिंक्डइनवर केली 'अशी' पोस्ट!
18
इराणच्या मिसाईल हल्ल्यांनी इस्राइलमध्ये हाहाकार; ३० हजारांहून अधिक घरे झाली उद्ध्वस्त!
19
Ax-4 Mission: अवकाश भरारी घेण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांनी ऐकलं हृतिक रोशनचं गाणं, नेमकं काय आहे कनेक्शन?
20
एमबीए, नोकरी, मग संन्यास... पण, नशिबाने पुन्हा आणले संसारात; तरुणाने उभं केलं १२५ कोटींचं साम्राज्य!

सायना, श्रीकांतला कठीण ड्रॉ

By admin | Updated: December 17, 2014 01:26 IST

भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, के.श्रीकांत उद्या, बुधवारपासून सुरू होणाऱ्या बीडब्ल्यूएफ विश्व सुपर सीरिज फायनल स्पर्धेत आपले नशीब अजमावणार आहेत़

दुबई : भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, के.श्रीकांत उद्या, बुधवारपासून सुरू होणाऱ्या बीडब्ल्यूएफ विश्व सुपर सीरिज फायनल स्पर्धेत आपले नशीब अजमावणार आहेत़ स्पर्धेत दोन्ही खेळाडूंना कठीण ड्रॉ मिळाला आहे़ त्यामुळे त्यांना स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागेल़ चायना सुपरचे जेतेपद मिळविल्यामुळे आत्मविश्वास उंचावलेली सायना व श्रीकांतला या स्पर्धेत जागतिक क्रमवारीतील अव्वल ८ खेळाडूंत समावेश असलेल्या खेळाडूंशी झुंजावे लागेल़ ही स्पर्धा दुबईत होणार आहे़ स्पर्धेत सायनाला चीनची शिजियान वांग, कोरियाची ह्युन सुंग आणि यिओन जू बाए यांचा सामना करावा लागेल़, तर श्रीलंकातला पुरुष गटात डेन्मार्कचा यान ओ योगेसेन, जपानचा केतो मोमोतो आणि इंडोनेशियाच्या टॉमी सुगियातोचे आव्हान राहील़ या स्पर्धेच्या प्रत्येक गटातून अव्वल दोन खेळाडू उपांत्य फेरीत पोहोचतील़ सायनाचा शिजियान विरुद्ध ५-५ असा विक्रम आहे़ असे असले तरी गत पाच सामन्यांपैकी ४ मध्ये चिनी खेळाडूने बाजी मारली आहे़ दुसरीकडे सुंगविरुद्ध सायनाचा विक्रम ४-१ असा आहे़ या दोन्ही खेळाडूंत झालेल्या गत लढतीत सायनाला पराभव स्वीकारावा लागला होता़ जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेल्या बाएविरुद्ध सायनाने ६ विजय मिळविले आहेत, तर ४ वेळा भारतीय खेळाडूला पराभवाचा सामना करावा लागला आहे़पुरुष गटात श्रीकांतच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष राहील़ कारण स्पर्धेत तो एकमेव पुरुष खेळाडू आहे़ त्याने यापूर्वी योगेसेन आणि मोमोतो यांना धूळ चारली आहे, तर सुगियार्तोकडून मात खावी लागली आहे़ स्पर्धेतील ‘अ’ गटाला ग्रुप आॅफ डेथ संबोधले जात आहे़ (वृत्तसंस्था)