शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रकुल स्पर्धेत फुलराणीची बाजी, सायनाला सुवर्ण, सिंधूला रौप्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2018 06:51 IST

सायना नेहवालने आक्रमक खेळी करत दोन्ही सेट जिंकून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले, तर पी. व्ही. सिंधूला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

गोल्ड कोस्ट : राष्ट्रकुल स्पर्धेत फुलराणी सायना नेहवाल हिने बाजी मारली आहे. बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीमध्ये सुवर्णपदकासाठी भारताच्या सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांच्यात आज सामना झाला. यामध्ये सायना नेहवालने आक्रमक खेळी करत दोन्ही सेट जिंकून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले, तर पी. व्ही. सिंधूला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

आजच्या सामन्यात सायना नेहवालने आक्रमक खेळी करत पी. व्ही. सिंधूचा  21-18, 23-21 असा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला. या सामन्यात सायना नेहवालला पी. व्ही. सिंधूने सुद्धा कडवी झुंज दिली. दोघींच्या या कामगिरीमुळे सुवर्ण आणि रौप्य अशी दोन्ही पदके भारताच्या खात्यात आली आहेत. त्यामुळे भारताकडे आता 26 सुवर्ण आणि 17 रौप्य पदके आली आहेत.

दरम्यान, शनिवारी उपांत्य फेरीत सायना नेहवाल आणि  पी. व्ही. सिंधू या दोघींनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध विजय मिळवत अंतिम फेरी गाठली होती. 22 वर्षीय ऑलिम्पिक रौप्यपदकविजेती सिंधू टाचेच्या दुखापतीमुळे मिश्र सांघिक स्पर्धेत खेळू शकली नाही. तिने गतविजेती मिशेल लीचा 21-18, 21-8 ने पराभव केला. जागतिक क्रमवारीतील माजी अव्वल खेळाडू सायना नेहवालने 2014 ची रौप्यपदक विजेती ख्रिस्टी गिलमोरची झुंज 21-14, 18-21, 21-17 ने मोडून काढली. या दोघींनीही अंतिम फेरी गाठल्यामुळे भारताचे सुवर्ण व रौप्यपदक निश्चित झाले होते.

2010 च्या दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेची चॅम्पियन सायना व 2014 ची कांस्यपदकविजेती सिंधू यांच्यादरम्यान गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सिनिअर राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये अंतिम लढत झाली होती. त्यात सायना नेहवालने बाजी मारली होती.

टॅग्स :Saina Nehwalसायना नेहवालCommonwealth Games 2018राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८