भारताची फुलराणी सायना नेहवाल ( Saina Nehwal) हीच्या बायोपिकचा पहिलं पोस्टर आणि टीजर मंगळवारी रिलीज झालं. 'सायना' या नावानं तयार होत असलेल्या चित्रपटात परिणीती चोप्रा ( Parineeti Chopra) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पण, सायनाच्या चित्रपटाच्या पहिल्याच पोस्टरनं वादाची सर्व्हीस केली आहे. सायनाच्या बायोपिकसाठी काम करणाऱ्या रिसर्च, बेसिक माहिती आणि फॅक्टशी जोडलेल्या लोकांवर टीका होत आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये सर्व्हिस करण्यापूर्वीच्या बॅडमिंटन शटलमध्ये सायनाचं नाव लिहिलेलं पाहायला मिळत आहे. पण, क्रिएटीव्ह टीमनं मोठी चूक केली आहे आणि बॅडमिंटनमध्ये सर्व्हीस करताना शटल वर उंचावलेलं दाखवलं आहे. मात्र, बॅडमिंटनची सर्व्हीस अशी होत नाही आणि पोस्टरमध्ये दाखवलेली सर्व्हीस टेनिसमध्ये होते.टेनिस आणि बॅडमिंटन यातील सर्व्हीस करण्याची पद्धत वेगवेगळी असते.
Saina Nehwal biopic: 'फुलराणी'च्या बायोपिकच्या पहिल्याच पोस्टरनं केली 'वादाची' सर्व्हीस; बॅडमिंटनचाहते संतापले
By स्वदेश घाणेकर | Updated: March 2, 2021 16:43 IST