शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

महाराष्ट्राची सावध सुरुवात

By admin | Updated: November 18, 2015 02:07 IST

बंगाल संघाने पहिल्या डावात उभारलेल्या ५२८ धावांच्या हिमालयापुढे यजमान महाराष्ट्राने राहुल त्रिपाठीच्या शतकाच्या जोरावर तिसऱ्या दिवसअखेर ३ बाद २९६ अशी मजल मारली.

पुणे : बंगाल संघाने पहिल्या डावात उभारलेल्या ५२८ धावांच्या हिमालयापुढे यजमान महाराष्ट्राने राहुल त्रिपाठीच्या शतकाच्या जोरावर तिसऱ्या दिवसअखेर ३ बाद २९६ अशी मजल मारली. महाराष्ट्र संघ अजूनही बंगालहून २३२ धावांनी पिछाडीवर आहे.महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात बंगालने तिसऱ्या दिवशी ८ बाद ५२८ धावांवरच आपला डाव घोषित केला. सुदीप चॅटर्जीचे जबरदस्त शतक आणि अभिमन्यू ईश्वरन, सयान मोंडल, श्रीवत्स गोस्वामी, पंकज शॉ आणि आमीर गानी यांनी झळकावलेले अर्धशतक या जोरावर बंगालने महाराष्ट्रासमोर मोठी धावसंख्या उभारली.यानंतर महाराष्ट्राची सुरुवात निराशाजनक ठरली. सलामीवीर हर्षद खाडिवले (५) याला स्वस्तात बाद करून अशोक दिंडाने महाराष्ट्राला ११ धावांवर पहिला धक्का दिला. स्वप्निल गुगळे (३५) व संग्राम अतीतकर यांनी ५६ धावांची भागीदारी करून संघाला सावरले. मात्र मुकेश कुमारने गुगळेला बाद करून ही जोडी फोडली. यानंतर त्रिपाठीने अतीतकरसह ९० धावांची भागीदारी केली. अतीततकर ११८ चेंडंूत ६ चौकारांसह ६९ धावा काढून बाद झाला. अंकित बावनेने त्रिपाठीसह १३९ धावांची नाबाद भागीदारी केली. त्रिपाठी २२७ चेंडूंत १३ चौकार व २ षटकारांसह ११६ धावा काढून खेळपट्टीवर टिकून आहे. दुसऱ्या बाजूला बावने ११२ चेंडूंत ५९ धावांवर खेळत आहे. (क्रीडा प्रतिनिधी)धावफलक :बंगाल (पहिला डाव) : अभिमन्यू ईश्वरन झे. त्रिपाठी गो. फल्लाह ६५, सयान मोंडल त्रि. गो. खुराना ५८, सुदीप चॅटर्जी यष्टीचीत मोटवानी गो. खुराना १४७, मनोज तिवारी झे. मोटवानी गो. मुथुस्वामी ३०, श्रीवत्स गोस्वामी झे. व गो. खुराना ५१, पंकज शॉ पायचीत गो. खुराना ५७, आमीर गानी धावबाद (अतीतकर) ५९, वीर प्रताप सिंग त्रि. गो. फल्लाह २८, प्रग्यान ओझा नाबाद १४, अशोक दिंडा नाबाद २. अवांतर - १७. एकूण : १८० षटकांत ८ बाद ५२८ धावा घोषित.गोलंदाजी : समाद फल्लाह ३७-७-१०२-२; अनुपम संक्लेचा २१-४-६२-०; श्रीकांत मुंढे ३२-६-८०-०; डॉमनिक मुथुस्वामी ३६-११-९८-१; चिराग खुराना ४१-५-१४१-४; संग्राम अतीतकर ८-०-२३-०; स्वप्निल गुगळे ५-१-१७-०.महाराष्ट्र (पहिला डाव) : स्वप्निल गुगळे पायचीत गो. मुकेश कुमार ३५, हर्षद खाडिवले झे. चॅटर्जी गो. दिंडा ५, संग्राम अतीतकर झे. चॅटर्जी गो. दिंडा ६९, राहुल त्रिपाठी खेळत आहे ११६, अंकित बावने खेळत आहे ५९. अवांतर - १२. एकूण : ९० षटकांत ३ बाद २९६ धावा.गोलंदाजी : अशोक दिंडा २३-१-७७-२; प्रग्यान ओझा १४-२-५२-०; वीर प्रताप सिंग १६-३-३९-०; मुकेश कुमार १२-३-२८-१; आमीर गानी १३-०-५६-०; मनोज तिवारी २-०-१०-०; सयान मोंडल १०-१-३०-०.