शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

सुवर्णकन्या हिमा दासचे केले सचिन तेंडुलकरने कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2019 23:14 IST

सचिनने आपल्या ट्विटरवर खास संदेश पाठवला आहे.

मुंबई : फक्त 19 दिवसांमध्ये पाच सुवर्णपदक जिंकणाऱ्या हिमा दासचे कौतुक मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने केले आहे. सचिनने आपल्या ट्विटरवर खास संदेश पाठवला आहे. या संदेशामध्ये सचिनने हिमावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला आहे.

सचिन आपल्या ट्विटमध्ये म्हणाला की, " युरोपमध्ये फक्त 19 दिवसांत तू पाच सुवर्णपदके पटकावली. तुझी ही कामगिरी युवा पिढीसाठी प्रेरणदायी आहे. भविष्यातील शर्यतींसाठी तुला शुभेच्छा."

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हिमाचे कौतुक केले आहे.

 

हिमा दासची 'सुवर्ण'पंचमी! महिनाभरात पटकावले पाचवे सुवर्णपदक

ढिंग एक्स्प्रेस या नावाने प्रसिद्ध झालेली भारताची युवा धावपटू हिमा दास हिची सध्या सोनेरी दौड सुरू आहे. शनिवारी झेक प्रजासत्ताकमधील नोवे मेस्टोनाड मेटुजी ग्रां.प्री. स्पर्धेत हिमाने महिलांच्या 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत अव्वलस्थान पटकावत सुवर्णपदकावर नाव कोरले. हे हिमा दास हिचे गेल्या महिनाभरातील पाचवे सुवर्णपदक ठरले आहे. 

हिमा हिने ट्विटरवर एक फोटो शेअर करून यासंदर्भातील माहिती दिली आहे. झेक प्रजासत्ताक येथे 400 मीटर शर्यत अव्वलस्थानी राहत पूर्ण केली. हिमा हिने 52.09 सेकंद वेळेत शर्यत पूर्ण केली. याआधी  झेक प्रजासत्ताक येथे झालेल्या टबोर अ‍ॅथलेटिक्स मीट स्पर्धेत हिमाने २०० मीटर शर्यतीत सुवर्ण कामगिरी केली. २३.२५ सेकंदाची वेळ देत तिने शानदार बाजी मारली होती. हिमाची सुवर्ण कामगिरी2 जुलैला पोजनान अ‍ॅथलेटिक्सग्रां. प्री. स्पर्धेत 200 मी. 23.65  सेकंदासह शर्यतीत सुवर्ण.7 जुलैला कुटनो अ‍ॅथलेटिक्समीट स्पर्धेत २०० मीटर शर्यतीत 23.97 सेकंदासह सुवर्ण.13 जुलै झेक प्रजासत्ताकयेथे क्लांदो अ‍ॅथलेटिक्स 200  मीटर शर्यतीत 23.43 सेकंदासह सुवर्ण.18 जुलै, झेक प्रजासत्ताकटबोर अ‍ॅथलेटिक्स मीट, २०० मीटर शर्यतीत २३.२५ सेकंदांसह सुवर्ण.20 जुलै झेक प्रजासत्ताक नोवे मेस्टोनाड मेटुजी ग्रां.प्री.  400 मीटर शर्यतीत 52.09 सेकंदांसह सुवर्णपदक. 

टॅग्स :Hima Dasहिमा दासSachin Tendulkarसचिन तेंडुलकर