शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

उपविजेत्या श्रीलंकेचे लक्ष जेतेपदाकडे

By admin | Updated: February 14, 2015 17:58 IST

क्रिकेट जगतातील सर्वात चिवट म्हणून ओळखला जाणारा आणि गेल्या दोन विश्‍वचषकात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेला श्रीलंकेचा संघ यंदा फायनलमध्ये पोहचण्याची हॅटट्रीक करायची

क्रिकेट जगतातील सर्वात चिवट म्हणून ओळखला जाणारा आणि गेल्या दोन विश्‍वचषकात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेला श्रीलंकेचा संघ यंदा फायनलमध्ये पोहचण्याची हॅटट्रीक करायची आणि त्यानंतर विजेतेपद मिळविण्याचे स्वप्न बाळगून आहे. पण हे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी श्रीलंकेच्या संघाला बरेच कष्ट करावे लागतील.
१९२६-२७ ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या श्रीलंका संघाला १९८१ मध्ये कसोटीचा दर्जा मिळाला. कसोटी खेळणारा तो आठवा देश बनला. १९९0 नंतर या संघाने आंतराष्ट्रीय क्षितिजावर आपली चमक दाखविण्यास प्रारंभ केला. तो पर्यंत हा संघ लिंबू-टिंबू म्हणूनच ओळखला जाईल. पण अर्जुन रणतुंगा आणि अरविंद डिसिल्वा या दोघांच्या कारकिर्दीत श्रीलंकेने गरुड भरारी घेतली. सलामीवीर सनथ जयसूर्याने या स्पर्धेतून एकदिवसीय क्रिकेटला आधुनिक चेहरा दिला. पहिले १0-१५ षटके सर्व संघ विकेट शाबूत ठेवून सावध सुरवात करण्यावर भर देत होते. पण जयसुर्या-कालुविथरणा या जोडीने पहिल्या चेंडूपासून तोडफोड फलंदाजी करण्याचा नवा पायंडा पाडला. याच्या जोरावर १९९६ला हा संघ विश्‍वविजेता बनला. त्यानंतर दोनदा अंतिम फेरी गाठूनही त्यांना विश्‍वविजयाची पुनरावृती करता आलेली नाही.
 
‘तरुण तुर्का’वरच भरवसा
२७ वर्षी अष्टपैलू अँजेला मॅथ्थ्यूजच्या नेतृत्त्वाखाली श्रीलंकेचा संघ यंदाच्या विश्‍वचषकात सहभागी होत आहे. संघात अनुभवी खेळाडूंचा भरणा असला तरी त्यांची खरी मदार कुमार संगक्कारा आणि महेला जयवर्धने या दोन दिग्गजांवर प्रामुख्याने असणार आहे. नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुध्दच्या वनडे मालिकेत या संघाला पराभव पत्करावा लागला होता. पण हा संघ केव्हाही भरारी मारु शकतो. मालिकेतील शेवटचा सामना जिंकल्यामुळे विजयाची पायधूळ घेवून ते स्पर्धेत उतरत आहेत. 
या सामन्यात संगक्काराने शतक झळकावल्यामुळे त्यांना विजय मिळविला. यावरुनच त्यांचा संघ या दोन शिलेदारांवर किती अवलंबून आहे ते दिसून येते. विश्‍वचषकात सहभागी संघांपैकी श्रीलंकेचा संघाचे सरासरी वय सर्वात जास्त आहे. ३७ वर्षीय संगक्कारा - जयवर्धने जोडीने अनेक वर्षे श्रीलंकेसाठी प्रतिनिधीत्व केले असून ते दोघेही या स्पर्धेनंतर नवृत्त होत आहेत. 
या दोघांबरोबरच ३८ वर्षीय तिलकरत्ने दिलशान याचाही हा शेवटचा वर्ल्डकप असेल, त्यांना विश्‍वविजय निरोप दिल्यास यापेक्षा मोठे भाग्य ते कोणते? आगळा-वेगळा गोलंदाज लसिथ मलिंगा याच्यावर श्रीलंकन आक्रमणाची भिस्त आहे.पण कुलसेकरा, धम्मिका प्रसाद हे तितके निष्प्रभ ठरत असल्याने संघाची कामगिरी ढासळत आहे. 
श्रीलंकेचे ब्रम्हास्त्र समजला जाणारा मुथैय्या मुरलीधरनची जागा भरुन काढणारा गोलंदाज अजून श्रीलंकेला गवसलेला नाही. ३६ वर्षीय रंगना हेराथ तो प्रयत्न करीत असला तरी त्याला अजून हुकमी एक्का बनता आलेले नाही. नव्या फळीतील गुणवान खेळाडूंचा स्त्रोत आटल्यामुळे श्रीलंकेला ‘तरुण तुर्का’वरच रेस खेळावी लागणार आहे.