रोनाल्डो, मोराटाची चमक रिअल माद्रिदचा विजय

By Admin | Updated: September 15, 2016 23:27 IST2016-09-15T23:27:13+5:302016-09-15T23:27:13+5:30

अखेरच्या क्षणी नोंदवलेल्या गोलच्या जोरावर रिअल माद्रिदने अडचणीतून सावरताना चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत स्पोर्टिंग लिस्बनविरुद्ध २-१ ने सरशी साधत विजयी सुरुवात केली.

Ronaldo, Morataca Glow Real Madrid's Victory | रोनाल्डो, मोराटाची चमक रिअल माद्रिदचा विजय

रोनाल्डो, मोराटाची चमक रिअल माद्रिदचा विजय

माद्रिद : ख्रिस्टियानो रोनाल्डो व अल्वारो मोराटा यांनी अखेरच्या क्षणी नोंदवलेल्या गोलच्या जोरावर रिअल माद्रिदने अडचणीतून सावरताना चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत स्पोर्टिंग लिस्बनविरुद्ध २-१ ने सरशी साधत विजयी सुरुवात केली.
लिस्बनच्या ब्रुनो सिजने सामन्याच्या दुसऱ्या सत्रात तिसऱ्या मिनिटाला गोल नोंदवित संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली, पण स्टार खेळाडू व पोर्तुगालचा कर्णधार रोनाल्डोने फ्री किकवर गोल नोंदवित माद्रिद संघाला १-१ अशी बरोबरी साधून दिली. इंज्युरी टाईममध्ये जेम्स रोड्रिगुएजच्या क्रॉसवर मोराटाने गोल नोंदवित माद्रिद संघाचा विजय निश्चित केला.
सामन्यानंतर प्रतिक्रिया देताना रोनाल्डो म्हणाला,‘आमची सुरुवात निराशाजनक झाली होती, पण फुटबॉल खेळ असाच असून माद्रिद संघही असाच खेळतो. आम्ही या ऐतिहासिक स्टेडियममध्ये पुनरागमन करण्यात यशस्वी ठरलो.’
माजी दिग्गज फुटबॉलपटू जिनेदिन जिदानने माद्रिद संघाच्या विजयाची प्रशंसा केली. जिदान म्हणाला,‘आम्ही अखेरपर्यंत प्रयत्न कायम ठेवल्यामुळे मला आनंद झाला.’(वृत्तसंस्था)

Web Title: Ronaldo, Morataca Glow Real Madrid's Victory