शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
3
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
4
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
5
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
6
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
7
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
8
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
9
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
10
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
11
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

रॉलिन्सचे नाबाद शतक

By admin | Updated: February 22, 2017 01:20 IST

इंग्लंडचा अर्धा संघ ११२ धावांत गुंडाळल्यानंतरही भारतीय गोलंदाजांच्या दबावाला बळी न पडता डेलरे रॉलिन्सने नाबाद शतकी

नागपूर : इंग्लंडचा अर्धा संघ ११२ धावांत गुंडाळल्यानंतरही भारतीय गोलंदाजांच्या दबावाला बळी न पडता डेलरे रॉलिन्सने नाबाद शतकी खेळी करीत १९ वर्षांखालील युवा संघाच्या दुसऱ्या कसोटीत पहिल्या दिवसअखेर इंग्लंडला ५ बाद २४३ अशा सुस्थितीत आणले.डेलरे रॉलिन्स १२४ धावा (२५४ चेंडू, १६ चौकार, २ षटकार) आणि विल जॅक्स ६६ धावा (१५३ चेंडू, १० चौकार) हे खेळपट्टीवर आहेत.जामठा येथील विदर्भ क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर मंगळवारी सुरू झालेल्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार मॅक्स होल्डनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताच्या मध्यमगती गोलंदाजांनी सुरुवातीला तीन धक्के दिले त्यावेळी इंग्लंडची एक धाव फळ्यावर लागली होती. रिषभ भगतने हॅरी ब्रुकला (१) पायचित केले. जॉर्ज बार्टलेटचा शून्यावर त्रिफळा उडविला. कनिश सेठच्या चेंडूवर मॅक्स होल्डनला सिद्धार्थ आकरेने झेलबाद केले. डेलरे रॉलिन्स व ओली पोपने उपहारापर्यंत धावसंख्येला आकार दिला. रॉलिन्स- पोपने चौथ्या गड्यासाठी ९८ धावांची भागीदारी केली. डेरिल फेरारिओने पोपला (४२ धावा) झेलबाद केले. इआॅन वुड्सला (५) यष्टिरक्षक एस. लोकेश्वरने झेलबाद करताच इंग्लंडची ५ बाद ११२ अशी अवस्था झाली होती. रॉलिन्सने चिवट झुंज देत १९४ चेंडंूत १४ चौकार व दोन षटकारांसह शतक तसेच विल जॅक्सने १२७ चेंडूंत ७ चौकाराच्या मदतीने अर्धशतक गाठले. या दोघांनी सहाव्या गड्यासाठी १३१ धावांची भागीदारी करीत इंग्लंडला सुस्थितीत आणले. रिषभ भगतने दोन गडी बाद केले. (क्रीडा प्रतिनिधी)संक्षिप्त धावफलक इंग्लंड (पहिला डाव) : हॅरी ब्रुक पायचित गो. भगत १, मॅक्स होल्डन झे. आकरे गो. सेठ ००, जॉर्ज बार्टलेट त्रि. गो. भगत ००, डेलरे रॉलिन्स खेळत आहे १२४, ओली पोप झे. फेरारिओ गो. त्यागी ४२, इआॅन वुड्स झे. लोकेश्वर गो. फेरारिओ ६, विल जॅक्स खेळत आहे ६६. अवांतर-४, एकूण-९० षटकांत ५ बाद २४३. गोलंदाजी : कनिश सेठ १/५४, रिषभ भगत २/३९, हर्ष त्यागी १/६०, डेलरे फेरारिओ १/५३.