शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
4
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
5
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
6
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
7
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
8
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
9
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
10
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
11
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
12
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
13
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
14
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
15
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
16
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
17
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
18
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
19
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
20
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी

रोहन बोपन्ना उपांत्य फेरीत; २०१५ नंतर पहिल्यांदाच ग्रँडस्लॅमच्या अव्वल चारमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 08:50 IST

बोपन्ना-मिडेलकूप यांनी झुंजार खेळाचे प्रदर्शन करताना लॉयड ग्लासपूल-हेन्री हेलियोवारा यांचा ४-६, ६-४, ७-६ असा पराभव केला.

पॅरिस : भारताचा अनुभवी टेनिसपटू रोहन बोपन्ना याने आपला डच जोडीदार एम. मिडेलकूप याच्यासह शानदार कामगिरी करताना फ्रेंच ओपन पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. दखल घेण्याची बाब म्हणजे गेल्या ७ वर्षांमध्ये बोपन्ना पहिल्यांदाच एखाद्या ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. याआधी त्याने २०१५ मध्ये विम्बल्डनची उपांत्य फेरी गाठली होती.

बोपन्ना-मिडेलकूप यांनी झुंजार खेळाचे प्रदर्शन करताना लॉयड ग्लासपूल-हेन्री हेलियोवारा यांचा ४-६, ६-४, ७-६ असा पराभव केला. पहिला सेट गमावल्यानंतर पिछाडीवर पडलेल्या बोपन्ना-मिडेलकूप यांनी जबरदस्त पुनरागमन करत सलग दोन सेट जिंकले. याआधी, बोपन्नाने २०१५ मध्ये रोमानियाच्या फ्लोरिन मर्जियासह खेळताना विम्बल्डनची उपांत्य फेरी गाठली होती. बोपन्ना-मिडेलकूप आता १२व्या मानांकित मार्शेलो अरेवालो-जीन ज्युलियन रॉजर यांच्याविरुद्ध खेळतील.

बोपन्ना-मिडेलकूप यांची लक्षवेधी आगेकूच

जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या बोपन्ना-मिडेलकूप यांनी आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर सर्वांना प्रभावित केले. स्पर्धेत आतापर्यंत त्यांची जोडी जायंट किलर ठरली. उप-उपांत्यपूर्वे फेरीआधी बोपन्ना-मिडेलकूप यांनी निकोला मेकटिक-मेट पेविक या क्रोएशियाच्या दुसऱ्या मानांकित जोडीचा ६-७ (५-७), ७-६ (७-३), ७-६ (१२-१०) असा झुंजार पराभव केला होता.

टॅग्स :Tennisटेनिस