शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

रॉजर फेडररचा 'पॉवर पंच', नदालचा पराभव करुन झाला शांघाय ओपनचा 'चॅम्पियन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2017 16:40 IST

जगातील अव्वल क्रमांकाच्या राफेल नदालला 6-4, 6-3 अशी सहज मात देत रॉजर फेडररने शांघाय मास्टर्स टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. फेडररचा नदालविरुध्दचा हा सलग पाचवा विजय होता.

शांघाय- जगातील अव्वल क्रमांकाच्या राफेल नदालला 6-4, 6-3 अशी सहज मात देत रॉजर फेडररने शांघाय मास्टर्स टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. फेडररचा नदालविरुध्दचा हा सलग पाचवा विजय होता. टेनिसमधील या आघाडीच्या दोन खेळाडूंदरम्यानचा हा 38 वा 'फेडाल' सामना होता. त्यात फेडररचा हा 15 वा विजय होता. 2014 च्या अॉस्ट्रेलियन ओपनपासून फेडरर सातत्याने नदालवर विजय मिळवत आला आहे. 

फेडररने सामन्याची सुरुवातच सर्विस ब्रेकसह दणक्यात केली आणि तोच धडाका कायम ठेवत 6-4,6-3 असा सहज विजय मिळवला. फेडररचा हा राफाविरुध्दचा पाचवा सरळ सेटमधील विजय आहे. 

फेडररचे हे दुसरे शांघाय विजेतेपद असुन कारकिर्दितील 94 वे विजेतेपद आहे. यासह त्याने इव्हान लेंडलच्या विजेतेपदांची बरोबरी केली असुन आता विजेतेपदांच्या बाबतीत केवळ जिमी कॉनर्स त्याच्यापुढे आहे. एटीपी मास्टर्स 1000 श्रेणीच्या स्पर्धांतील फेडररचा हा 350 वा विजय आहे. 

शांघाय ओपनमध्ये नदालवर त्याने आपले रेकॉर्ड 3-0 असे केले आहे. यंदा विम्बल्डननंतर फेडररने प्रथमच कोणती स्पर्धा जिंकली असली तरी यंदाचे त्याचे हे सहावे अजिंक्यपद आहे. यंदाच फेडररने अॉस्ट्रेलियन ओपन व मियामी ओपनच्या अंतिम फेरीत आणि फ्रेंच ओपनच्या चौथ्या फेरीत नदालला मात दिली होती. त्यानंतर आजच्या या विजयासह त्याने नंबर वन नदालच्या सलग 16 विजयांची मालिका खंडीत केली आहे. असे असले तरी जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थान नदालकडेच कायम राहणार आहे. फेडररने याआधी 2014 मध्ये ही स्पर्धा जिःकली होती तर 2010 मध्ये तो उपविजेता होता.