शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

Ballon d’Or 2024: फुटबॉल जगतातील मानाचा पुरस्कार जिंकत Rodri नं रचला इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 10:13 IST

या पुरस्कारासाठी रिअल मॅड्रिडकडून खेळणारा  ब्राझीलचा विनिसियस ज्युनिअर आणि इंग्लंडचा जूड बेलिंगहॅम हे खेळाडूही शर्यतीत होते. त्यांना मागे टाकत रॉड्रीनं बाजी मारली. 

Rodri wins Ballon d’Or 2024 : स्पेन आणि मँचेस्टर सिटीचा मिडफील्डर रोड्री याने फुटबॉल जगतातील सर्वोत्तम खेळाडूला दिला जाणारा प्रतिष्ठित  बॅलोन डी'ओर पुरस्कार जिंकला आहे. या पुरस्कारासाठी रिअल मॅड्रिडकडून खेळणारा  ब्राझीलचा विनिसियस ज्युनिअर आणि इंग्लंडचा जूड बेलिंगहॅम हे खेळाडूही शर्यतीत होते. त्यांना मागे टाकत रॉड्रीनं बाजी मारली. 

मानाचा पुरस्कार जिंकणारा मँचेस्टरचा पहिला खेळाडू ठरला रोड्री 

फुटबॉल जगतातील मानाचा पुरस्कार पटकावणाऱ्या रॉड्री याने मागच्या हंगामात आपल्या संघाला सलग चौथ्यांदा प्रीमियर लीग ट्रॉफी जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता.  स्पेनच्या संघानं विक्रमी जेतेपद मिळवल्यानंतर यावर्षीच्या युरोपीय चॅम्पियनशिपमध्ये तो सर्वोत्तम खेळाडूही ठरला होता. बॅलोन डी'ओर पुरस्कार जिंकणारा मँचेस्टर सिटीचा तो पहिला खेळाडू आहे.

६४ वर्षांनी स्पॅनिश खेळाडूनं जिंकला हा पुरस्कार स्पेनच्या संघानं २०१० मध्ये वर्ल्ड कप स्पर्धा आणि २००८, २०१२ मध्ये युरो कप स्पर्धा जिंकली. पण मागील ६४ वर्षांत एकाही स्पॅनिश खेळाडूला हा पुरस्कार जिंकता आला नव्हता. १९६० नंतर पहिल्यांदा स्पॅनिश खेळाडूनं बॅलोन डी'ओर पुरस्कारावर आपलं नाव कोरलं आहे. याआधी लुइस सुआरेझ या दिग्गजाने हा मानाचा पुरस्कार पटकावला होता. त्यावेळी तो बार्सिलोनाकडून खेळायचा.  रिअल मॅड्रिडसाठी दिग्गज अल्फ्रेडो स्टेफानो डी स्टेफानो यांनी १९५७ आणि १९५९ मध्ये दोन वेळा हा पुरस्कार पटकावला होता.  

बॅलन डी'ओर २०२४ पुरस्कार विजेत्यांची यादी 

  • बॅलन डी'ओर: रोड्री
  • बॅलन डी'ओर फेमिनिन: ऐताना बोनमती
  • कोपा ट्रॉफी: लामिन यामल
  • पुरुष कोच ऑफ द ईयर: कार्लो एंसेलोटी  
  • महिला कोच ऑफ द ईयर: एम्मा हेस
  • याशिन ट्रॉफी: एमिलियानो मार्टिनेज
  • पुरुष क्लब ऑफ द ईयर: रियल मॅड्रिड
  • महिला क्लब ऑफ द ईयर: बार्सिलोना
  • गर्ड मुलर ट्रॉफी: हॅरी केन आणि किलियन एम्बापे
टॅग्स :Footballफुटबॉल