शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

भारताला जागतिक जेतेपद मिळवून देण्याचे लक्ष्य- रितू फोगाट

By स्वदेश घाणेकर | Published: November 14, 2019 4:02 AM

बबिता फोगाट यांची बहीण रितू फोगाटने कुस्ती सोडण्याचा निर्णय घेतला असून ती आता मिक्स मार्शल आर्ट्समध्ये (एमएमए) आपले नशीब आजमावण्यास सज्ज झाली आहे.

स्वदेश घाणेकर मुंबई : ‘दंगल गर्ल’ गीता आणि बबिता फोगाट यांची बहीण रितू फोगाटने कुस्ती सोडण्याचा निर्णय घेतला असून ती आता मिक्स मार्शल आर्ट्समध्ये (एमएमए) आपले नशीब आजमावण्यास सज्ज झाली आहे. राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या रितूच्या या निर्णयाने भारतीय कुस्ती क्षेत्राला धक्का बसला. पण, ‘एमएमए’च्या जागतिक जेतेपदातून ते नुकसान भरून काढण्याचा निर्धार रितूने ‘लोकमत’कडे बोलून दाखवला आहे. १६ नोव्हेंबरला रितू बीजिंग येथील कॅडिलॅक अरेना येथे एमएमएमध्ये पदार्पणाचा सामना खेळणार आहे.रितूने वयाच्या आठव्या वर्षापासून कुस्ती खेळण्यास सुरुवात केली. २०१६च्या राष्ट्रकुल कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत रितूने ४८ किलो वजनी गटात सुवर्ण जिंकले होते. शिवाय जागतिक (२३ वर्षांखालील) कुस्ती स्पर्धेत तिने रौप्यपदकाची कमाई करून इतिहास घडवला. या स्पर्धेत रौप्य जिंकणारी ती पहिलीच भारतीय कुस्तीपटू ठरली. २०१७च्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत तिने कांस्य जिंकले. पण, त्यानंतर ती कुस्तीपासून दुरावली. तिच्या डोक्यात काही वेगळाच विचार सुरू होता आणि तो तिने आता प्रत्यक्षात उतरवला आहे. ‘भारतात मिक्स मार्शल आटर््सची फारसी क्रेझ नाही. पण, मला या खेळाने आकर्षित केले. गीता, बबिता, विनेश आणि कुटुंबीयांशी याविषयी चर्चा केली. त्यांना हा निर्णय कळवला आणि त्यांनीही विरोध न करता सहमती दर्शवली,’ असे रितूने सांगितले.अपयशाला न घाबरता सतत पुढे जाण्याच्या वृत्तीने रितूला यश मिळवून दिले आणि ‘एमएमए’मध्येही त्याचीच पुनरावृत्ती करेन, असा विश्वास रितूने व्यक्त केला. ती म्हणाली, ‘सतत नवीन काहीतरी शिकायला पाहिजे. यश-अपयश हा आयुष्याचाच भाग आहे. त्यामुळे अपयशाने न खचता पुढे चालण्याचे संस्कार माझ्यावर झाले आहेत. भविष्यात कुस्तीकडे पुन्हा वळणार की नाही, याबाबत आत्ताच सांगू शकत नाही. सध्या माझे लक्ष्य मिक्स मार्शल आटर््समध्ये भारतासाठी यश मिळविण्याचे आहे. आधी ते पूर्ण करते, नंतर पुढील लक्ष्य ठरवते. भारताला या स्पर्धेत जागतिक जेतेपद पटकावून देण्याचा निर्धार आहे.’>‘सरावाला कधी घाबरले नाही!’कुस्ती आणि मिक्स मार्शल आटर््स यांच्यात बराच फरक आहे. तो ताळमेळ कसा राखला, असे विचारल्यावर रितू म्हणाली, ‘टीव्हीवरमिक्स मार्शल आटर््सचे अनेक सामने पाहिले होते. त्यामुळे आपणही त्यात कारकिर्द करावी असे वाटत होते.कुस्ती आणि मिक्स मार्शल आर्ट्सचे डावपेच यातफरक आहे. खेळ कोणताही असो सरावाला कधीच घाबरले नाही. आता मी मिक्स मार्शल आटर््सचा कसूनसराव केला आहे.’

टॅग्स :Wrestlingकुस्ती