शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

ऋषभ-संजूची वादळी फटकेबाजी

By admin | Updated: May 5, 2017 01:11 IST

वृषभ पंत आणि संजू सॅमसन यांच्या वादळी खेळीच्या जोरावर दिल्लीने गुजरातचा 7 विकेट्स राखून धुव्वा उडवला

नवी दिल्ली : भल्यामोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करताना दिल्ली डेअरडेव्हिल्सने ऋषभ पंत व संजू सॅमसन यांच्या वादळी खेळीच्या जोरावर गुजरात लायन्सला ७ विकेट्सने लोळवले. यासह पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या दिल्लीने सलग दुसरा विजय नोंदवताना प्लेआॅफ गाठण्याच्या आशा कायम राखल्या असून गुजरातचे आव्हान जवळपास संपल्यात जमा झाले आहे. 

फिरोझशाह कोटला स्टेडियवर झालेल्या या सामन्यात दिल्लीकरांनी चांगली सुरुवात करताना गुजरातला झटपट दोन धक्के दिले. मात्र, नंतर गुजरातचा कर्णधार सुरेश रैना व दिनेश कार्तिक यांनी गुजरातला २० षटकांत ७ बाद २०८ धावांची मजबूत मजल मारून दिली. या वेळी, दिल्लीच्या हातून हा सामना निघून गेल्याचेच चित्र दिसत होते. परंतु, सॅमसन - पंत यांंच्या जोरावर दिल्लीने १७.३ षटकांतच बाजी मारताना ३ बाद २१४ धावा केल्या. कर्णधार करुण नायर (१२) अपयशी ठरल्यानंतर सॅमसन - पंत यांनी १४३ धावांची तुफानी भागीदारी करून दिल्लीला विजयी मार्गावर आणले. सॅमसनने ३१ चेंडंूत ७ षटकारांचा नजराणा पेश करून ६१ धावा कुटल्या. दुसरीकडे, पंतने ४३ चेंडूंत ९७ धावांची वादळी खेळी केली. विशेष म्हणजे अनुभवी रवींद्र जडेजावर हल्ला चढवताना या दोघांनी त्याला २ षटकांत २८ धावांचा चोप दिला. हे दोघे बाद झाल्यनंतर श्रेयस अय्यर व कोरी अँडरसन यांनी दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. पंत शतकापासून केवळ ३ धावा दूर असताना बाद झाला.  तत्पूर्वी, द्वेन स्मिथ - ब्रेंडन मॅक्युलम ही आक्रमक सलामी जोडी स्वस्तात परतल्यानंतर रैनाने केलेल्या तडाखेबंद अर्धशतकाच्या जोरावर गुजरातने धावांचा डोंगर रचला. स्मिथ (९) आणि मॅक्युलम (१) स्वस्तात परतल्याने गुजरातची दुसऱ्याच षटकात २ बाद १० धावा अशी अवस्था झाली होती. मात्र, रैनाने सगळी सूत्रे आपल्याकडे घेत चौफेर फटकेबाजी करत ४३ चेंडूत ५ चौकार व ४ षटकारांसह ७७ धावांची खेळी केली. रैनानंतर कार्तिकने आक्रमक पवित्रा घेत ३४ चेंडूंत ५ चौकार व ५ षटकारांसह ६५ धावा काढल्या. अखेरच्या काही षटकांमध्ये रवींद्र जडेजाने (७ चेंडूंत १८*) केलेल्या फटकेबाजीमुळे गुजरातने दोनशेचा पल्ला पार केला. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलकगुजरात लायन्स : २० षटकांत ७ बाद २०८ धावा : (सुरेश रैना ७७, दिनेश कार्तिक ६५; कागिसो रबाडा २/२८, २/३०) पराभूत वि. दिल्ली डेअर डेव्हिल्स : १७.३ षटकांत ३ बाद २१४ धावा (ऋषभ पंत ९७, संजू सॅमसन ६१; रवींद्र जडेजा १/२८, बासिल थम्पी १/४०, प्रदीप संगवान १/४३).