शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

दत्तू भोकनळच्या शिक्षेचा फेरविचार करा, बत्रा यांची नौकानयन महासंघाला सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 03:20 IST

दोन वर्षांच्या बटदीची शिक्षा पहिल्यांदा चूक करण्यासाठी कठोर असल्याचे मत व्यक्त करीत भारतीय नौकानयन महासंघाने (आरएफआय) यावर फेरविचार करावा,

नवी दिल्ली : दत्तू भोकनळवर लावण्यात आलेली दोन वर्षांच्या बटदीची शिक्षा पहिल्यांदा चूक करण्यासाठी कठोर असल्याचे मत व्यक्त करीत भारतीय नौकानयन महासंघाने (आरएफआय) यावर फेरविचार करावा, अशी सूचना भारतीय आॅलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी केली आहे.भोकनळ हा २०१८ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेदरम्यान रेसच्या मध्येच थांबला होता. यामुळे त्याच्यावर बंदी घालण्यात आली. विश्व चॅम्पियनशिपची कांस्य विजेती लांब उडीपटू अंजू बॉबी जॉर्ज हिने आयओएला पत्र लिहून दत्तूवरील अन्यायाकडे लक्ष वेधले. यावर बत्रा यांनी हस्तक्षेप केला. आयओएच्या अ‍ॅथलिट आयोगाची अध्यक्ष असलेल्या अंजूने आगामी टोकियो आॅलिम्पिक लक्षात घेत भोकनळवरील शिक्षा कमी करण्याची शिफारस केली. आरएफआय अध्यक्ष राजालक्षमी देव यांना लिहिलेल्या पत्रात बत्रा म्हणाले, ‘मी यावर दुसऱ्यांदा विचार करण्याची विनंती करतो. कारण एखाद्या खेळाडूने पहिल्यांदा चूक केल्यास त्याला सहा महिन्यांपेक्षा अधिक बंदीची शिक्षा दिली जावी, असा कुठलाही नियम नाही. त्याने जाणिवपूर्वक कृती केली नसेल, तर त्याच्यावरील बंदी कमी केली जावू शकते.’ (वृत्तसंस्था)>दोन वर्षांची बंदीभोकनळ आशियाई स्पर्धेत पुरुषांच्या स्क्वॉड्रल स्कल्स प्रकारात सुवर्ण विजेत्या चार जणांच्या पथकाचा सदस्य होता. सिंगल स्कल प्रकारादरम्यान तो स्पर्धेच्या मध्येच थांबला होता. यानंतर भोकनळने, ‘मी नावेवरुन पडलो होतो. नाव उलटल्यामुळे त्या दिवशी मला चांगले वाटत नव्हते,’ असे म्हटले होते. आरएफआयने मागच्यावर्षी पाच महिन्यात दत्तूला दोन वर्षांच्या बंदीची शिक्षा सुनावली शिवाय त्याचे म्हणणेही फेटाळून लावले होते.