शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

भारताच्या पराभवाची आणि पाकिस्तानच्या विजयाची ही आहेत कारणे

By admin | Updated: June 19, 2017 07:10 IST

आतापर्यंत तलवारीसारख्या तळपणाऱ्या भारतीय फलंदाजांची कामगिरी पाकपेक्षा सरस ठरेल असेच वाटले होते. विराट कोहलीसह त्याचे शेरही ढेर झाले.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 19 - चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश करुन तिसऱ्यांदा जेतेपद मिळवण्याची स्वप्न पाहणाऱ्या टीम इंडियाला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. पाकिस्तानने सर्वच स्तरावर भारतापेक्षा वरचढ कामगिरी करत विजय मिळवला. भारताच्या पराभवानंतर सर्वच ठिकाणी भारतीय संघातील खेळाडूंवर टीका होत आहे. भारतीय संघ आपेक्षांच्या ओझ्याखाली दबला गेला का? भारतीय गोलंदाजी सोबतच फलंदीजीमध्ये कुठे चुकला याबद्दल बऱ्याच चर्चा सुरु झाल्या आहेत. आतापर्यंत तलवारीसारख्या तळपणाऱ्या भारतीय फलंदाजांची कामगिरी पाकपेक्षा सरस ठरेल असेच वाटले होते. विराट कोहलीसह त्याचे शेरही ढेर झाले. त्यानंतर या पराभवाची कारणे काय आहेत हे अनेकजण शोधत आहेत. भारताच्या दारुण पराभवाची आणि पाकिस्तानच्या विजयात काय फरक होता. भारत कुठे कमी पडला याची काय कारणं आहेत जाणून घेऊयात..सामन्याचे विश्लेषन केले असता भारताची पहिली चूक कोणती असेल तर पाकिस्तानी फलंदाजांना भागिदारी करण्यापासून रोखू शकले नाहीत. त्यांनी संयमी फलंदाजी केली. संथ सुरुवातीनंतर आक्रमक धावा जमावल्या. बुमराह आणि भुवनेश्वरने धावा रोखल्या पण बळी घेण्यात अपयशी ठरले. त्यामुळे पाकिस्तानला चांगली सलामी मिळाली. मोठ्या धावसंखेचा पाया रचला गेला. पंड्याने दहा षटकांत60 च्या आत धावा दिल्या असल्या तरी सुरुवातीला त्याने आणि बुमराहने दिशाहीन मारा केला. पंड्याला संघात तिसरा वेगवान गेलंदाज म्हणून स्थान दिले होते. भारताची फिरकी जोडी अपयशी ठरली. आर. अश्विनच्या गोलंदाजीचा पाक संघांनी पुरेपूर समाचार घेताना धावा वसूल केल्या. आर आश्विन आणि रविंद्र जाडेजा यांचं फिरकी अस्त्र निकामी ठरण भारताच्या पराभवातील एक कारण आहे. पाकिस्तानच्या वेगवान माऱ्यासमोर भारताचे रथी-महारथी फेल ठरले. भऱवश्याच्या म्हशीने टोनगा दिला म्हणतात त्याप्रमाणे भारतीय फलंदाजीच या सामन्यात झालं. जुनैद-आमिरच्या धारधार गोलंदाजीसमोर कोहली, रोहित शर्मा, धोनी, युवराज यांचं सपशेल लोटांगण घेतलं. भारताच्या फलंदाजांसोबत विराटच्या कॅप्टनशीपबद्दलही अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. पाकिस्तानच्या फलंदाजांकडून सपाटून मार खात असतानाही आर.अश्विनला सातत्याने गोलंदाजी देण्याच्या निर्णयावर जोरदार टीका होत आहे. बांगलादेशविरूद्धच्या विजयात मोक्याच्या क्षणी दोन विकेट घेऊन सामन्याला कलाटणी देणा-या केदार जाधवला जवळपास 40 व्या षटकात विराटने गोलंदाजी दिली. डेथ ओव्हर्समध्ये पार्ट टाइम बॉलरला गोलंदाजी देणं योग्य नव्हतं. पाकिस्तानने सुरुवातीच्या भारताविरोधात झालेल्य पराभवातून धडा आपल्या कामगिरीती सुधारणा केली. आपल्या चूका त्यांनी सुधारल्या. आपले बलस्थान असेल्या विभागात त्यांनी आणखी भर देत ते मजबूत बनवलं. वेगवान आक्रमण या बलस्थानावर पाक गोलंदाजांनी भर दिला. प्रथम फलंदाजी करण्याच्या मिळालेल्या संधीचं पाकनं सोनं केलं. संथ सुरुवातीनंतर मोठ्या भागिदारी करत विराट धावसंध्या उभा केली. सर्वात महत्वाचे म्हणजे पाकिस्तानने आपल्या क्षेत्ररक्षणामध्ये सुधारणा केली. अंतिम सामन्यात ती दिसून येत होती. अंतिम सामन्यातील पराभवानंतर विराटसेनेन बोध घेत आपल्या कामगिरीत सुधारणा करायला हवी. अंतिम सामन्यात भारतीय संघ दबावात दिसून आला पहिल्या षटकांपासूनच पाकिस्तानचा संघ सर्वच क्षेत्रात भारतापेक्षा सरस असल्याचे दिसून आले.